चोरट्यांचा स्टुडिओवर डल्ला

By Admin | Updated: February 6, 2017 00:33 IST2017-02-06T00:33:20+5:302017-02-06T00:33:20+5:30

सव्वा लाखाचा मुद्देमाल लंपास : पणदूर येथील घटना

Nook on the thieves studio | चोरट्यांचा स्टुडिओवर डल्ला

चोरट्यांचा स्टुडिओवर डल्ला

कुडाळ : पणदूर येथील फोटो स्टुिडओ फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी कुडाळ पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पणदूर तिठा येथील महामार्गालगत उत्पल गायकवाड यांचा मालती फोटो स्टुडिओ आहे. रोजच्याप्रमाणे उत्पल हे रविवारी सकाळी फोटो स्टुडिओत आले असता स्टुडिओच्या शटरचे कुलूप कापून टाकल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी स्टुडिओ उघडून पाहिला असता आतील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तसेच स्टुडिओतील सुमारे ५८ हजार रुपये किमतीचा कॅमेरा तसेच मेमरी कार्ड व इतर साहित्य मिळून सुमारे सव्वा लाखाचा मुद्देमाल गायब होता. गायकवाड यांनी याबाबत कुडाळ पोलिसात माहिती दिली असून कुडाळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणी अधिक तपास कुडाळ पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Nook on the thieves studio