शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षांत संशोधन नाही; पगारावर मात्र ५ कोटी खर्च!; दापोली कृषी विद्यापिठाची आंबा उत्पादनाबाबत अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2024 19:18 IST

सरकारने लक्ष घालण्याची शेतकऱ्यांची मागणी

देवगड : रामेश्वर येथील आंबा उत्पादन संशोधन उपकेंद्र स्थापन झाले, मात्र गेल्या १० वर्षांत आंबा उत्पादनासाठी कोणतेही नवीन संशोधन झालेले नाही. मात्र, या कालावधीत निव्वळ पगारासाठी ५ कोटींहून अधिक रक्कम खर्च झाल्याने हे संशोधन केंद्र आता पांढरा हत्ती ठरला आहे.

दरवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि कीड यांमुळे उत्पादन दिवसेंदिवस कमी होऊन आंबा उत्पादकांना फटका बसत आहे. अशा वेळी दापोली येथील ‘डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यपीठा’च्या अंतर्गत कार्य करणाऱ्या या संशोधन केंद्राने आंबा उत्पादनाविषयीची अनास्था झाली आहे, तसेच आंबा उत्पादकांसाठी प्रभावी कृती कार्यक्रम राबवणे, तसेच उपयुक्त संशोधन करण्याची आवश्यकता आहे. यासाठी आता राज्य सरकारने यात गंभीरपणे लक्ष घालावे, अशी मागणी आंबा उत्पादक आणि हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने पत्रकार परिषदेतून केली.

देवगड येथील हॉटेल वेदा येथे झालेल्या पत्रकार परिषदेला ‘आंबा व्यापारी संघटने’चे अध्यक्ष विलास रूमडे, तसेच आंबा उत्पादक सर्वश्री विकास दीक्षित, दत्तात्रय जोशी, बापर्डे सरपंच संजय लाड, सनातन संस्थेचे सद्गुरू सत्यवान कदम, हिंदू विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, हिंदू जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर आणि हिंदू जनजागृती समितीचे राजेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

दरवर्षी आंब्यावरील विविध रोग आणि कीड यांमुळे उत्पादन कमी होणे, गुणवत्ता खालावणे, तसेच खर्चात वाढ होणे यांसारख्या समस्या आंबा उत्पादकांना भेडसावत आहेत. त्यातच रासायनिक औषधांबाबत उत्पादकांमध्ये मोठा गोंधळ असून, कंपन्यांकडून योग्य माहिती मिळत नसल्याने उत्पादकांना आर्थिक तोटा होत आहे. मात्र, रामेश्वर येथील आंबा संशोधन उपकेंद्राकडून यासंदर्भात कोणतेही दिशादर्शन मिळत नाही, असे दिसून येते. उत्पादकांच्या मूलभूत समस्या सोडवण्याऐवजी या आंबा संशोधन केंद्रातून ‘ड्रॅगन फ्रूट’ची शेती केली जात आहे, हा काय प्रकार आहे? असा प्रश्नही यावेळी विचारण्यात आला.

माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचविणे गरजेचेया संशोधन केंद्रामध्ये आंब्याच्या विविध जातींवर आधारित प्रत्यक्ष संशोधन करणे, तसेच तिथे उत्पादकांसाठी लागवड, तंत्रज्ञान, रोगनिवारण आणि विपणन यावर आधारित प्रशिक्षण आणि मार्गदर्शन केंद्र सुरू करणे आवश्यक आहे. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सर्वत्र केला जातो, तर संशोधनातून मिळणारी माहिती व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब आदी सामाजिक माध्यमांद्वारे, संकेतस्थळे यांद्वारे उत्पादकांपर्यंत पोहोचवणे वा त्यांच्याशी संवाद साधण्याचे काम संशोधन केंद्राने केले पाहिजे.

आंदोलनाचा इशारायासोबतच संशोधन केंद्रामध्ये आंबा उत्पादनाशी संबंधित डिप्लोमा कोर्स सुरू करणे, ज्यामुळे पुढच्या पिढ्यांना तंत्रज्ञान आणि व्यवसायिवषयक कौशल्य मिळेल, अशा मागण्याही यावेळी करण्यात आल्या. आंबा उत्पादकांना या संदर्भात काही समस्या असतील, तर त्यांनी ‘सुराज्य अभियाना’चे डॉ. रविकांत नारकर यांना संपर्क साधावा. तसेच आंबा उत्पादकांच्या वरील मागण्यांची दखल घेऊन राज्य सरकारने तत्काळ सुधारणा करावी, अन्यथा आंबा उत्पादकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMangoआंबाResearchसंशोधनFarmerशेतकरी