शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

नीतेश राणे यांचा ‘रिफायनरी’ विरोधात एल्गार, गिर्ये येथील जाहीर सभा : शिवसेनेचा प्रकल्पाला आतून पाठिंबा; ...तर ‘त्या’ व्यक्तींची गय करणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 14:49 IST

ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी अधिकारीवर्ग जर प्रयत्न करीत असेल तर त्यांची गाठ राणे कुटुंबीयांशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. मात्र ते हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मात्र मतांसाठीच दिखाऊपणा करीत ते विरोध करीत आहेत. उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असून ते हा प्रकल्प रद्द होण्याची का वक्तव्ये करीत नाहीत. यावरुन शिवसेनेचा या प्रकल्पाला आतून पाठिंबा असल्याचे सरळपणे दिसून येत आहे, असे मत आमदार नीतेश राणे यांनी गिर्ये येथील जाहीर सभेत व्यक्त केले.

ठळक मुद्देनीतेश राणे यांचा ‘रिफायनरी’ विरोधात एल्गारगिर्ये येथील जाहीर सभा शिवसेनेचा प्रकल्पाला आतून पाठिंबा...तर ‘त्या’ व्यक्तींची गय करणार नाही

 

देवगड : ग्रीन रिफायनरी प्रकल्प होण्यासाठी अधिकारीवर्ग जर प्रयत्न करीत असेल तर त्यांची गाठ राणे कुटुंबीयांशी आहे हे त्यांनी लक्षात ठेवावे. शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. मात्र ते हा प्रकल्प रद्द होण्यासाठी आत्मीयतेने प्रयत्न करताना दिसून येत नाहीत. मात्र मतांसाठीच दिखाऊपणा करीत ते विरोध करीत आहेत.

उद्योगमंत्री हे शिवसेनेचे असून ते हा प्रकल्प रद्द होण्याची का वक्तव्ये करीत नाहीत. यावरुन शिवसेनेचा या प्रकल्पाला आतून पाठिंबा असल्याचे सरळपणे दिसून येत आहे, असा आरोप आमदार नीतेश राणे यांनी गिर्ये येथील जाहीर सभेत केला.

गिर्ये-रामेश्वर येथील होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले, कोकणामध्ये विनाशकारी प्रकल्प आपण कधीही होऊ देणार नाही.

कोकणचे पर्यटन हे निसर्गसौंदर्याने बहरलेले आहे. गिर्ये-रामेश्वरमधील एक हजार क्षेत्रामध्ये होणारा हा ग्रीन रिफायनरी प्रकल्प म्हणजे येथील पर्यटनासहीत आंबा बागायतींचा ऱ्हास करणारा प्रकल्प आहे. असा प्रकल्प आपण कधीही या ठिकाणी होऊ देणार नाही. या ठिकाणी प्रकल्प उभारायचे असतील तर पर्यटनाचे प्रकल्प येथे आणले पाहिजेत. यामुळे पर्यटनाला चालना मिळून येथील लोकांना रोजगार मिळेल. असे जर कोणी केले तर मी नक्कीच स्वत: त्यांचा जाहीर सत्कार करीन. मात्र विनाशकारी प्रकल्प आणणाऱ्या व्यक्तींची आपण कधीही गय करणार नाही.ते पुढे म्हणाले, शिवसेना कोकणी जनतेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्याचे काम करीत आहे. जगात सर्वात मोठा होणारा ग्रीन रिफायनरी प्रकल्प हा कोकणात का आणला जातो? परदेशामध्ये असे प्रकल्प प्रदुषणामुळे उभारले जात नाहीत. मात्र आपले खासदार असा प्रकल्प कोकणामध्ये उभारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. हा प्रकल्प गुहागरमध्ये होणार होता. मात्र तेथील जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने हा प्रकल्प राजापूर परिसरात व देवगड तालुक्यातील गिर्ये-रामेश्वर येथे होण्यासाठी खासदार विनायक राऊत यांनीच आणला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीरपणे सांगितले आहे.

हे सांगितल्यावर विनायक राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवरती न्यायालयात हक्कभंग सादर करुन कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले होते. मात्र अद्यापपर्यंत ती का केली नाही? यावरुन असे स्पष्ट दिसून  येते की, हा प्रकल्प खासदार विनायक राऊत यांच्यामुळेच या ठिकाणी लादला गेला आहे.असा हा विनाशकारी प्रकल्प कधीही आपण होऊ देणार नाही. नारायण राणे यांच्या विचारसरणीमधूनच आमची जडणघडण झाली आहे. त्यामुळे  कोकणकडे कोणी वाईट नजरेने पाहण्याचा प्रयत्न करीत असेल तर तो आपण मुळासकट मोडून काढू असे सांगतानाच कोकणचे भवितव्य व कोकणचे निसर्गसौंदर्य स्वाभिमान पक्षच टिकवू शकतो, असे मत आमदार नीतेश राणे यांनी व्यक्त केले.ठाकरे यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावेनीतेश राणे म्हणाले,  शिवसेनेचे कोकणामधील २४ आमदार आहेत. उद्योगमंत्रीदेखील शिवसेनेचेच आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई हे ग्रीन रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याची भाषा का करीत नाहीत? शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हा प्रकल्प रद्द करण्याची भाषा वापरत आहेत. तर त्यांनी उद्योगमंत्र्यांनाच हा प्रकल्प रद्द करण्यासाठी सांगावे.

राजापूरला येऊन तेथील जनतेला हा प्रकल्प रद्द करण्याची नौटंकी ठाकरे यांनी करु नये. आता त्यांनी लोकांची दिशाभूल करणे थांबवावे. सत्तेमधून बाहेर पडणार असे शिवसेना नेहमीच सांगत आहे. मात्र ते सत्तेमधून बाहेर पडत नाहीत. सत्तेमधून भाजप पक्षाने शिवसेनेला हाकलून लावले तरी शिवसेना सत्तेमधून कधीही बाहेर पडणार नाही. सत्तेसाठी लाचार झालेला पक्ष हा शिवसेना पक्ष आहे, अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Nitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग