शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंनी स्वतःच्या स्वार्थासाठी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये - सतीश सावंत 

By सुधीर राणे | Updated: December 15, 2023 12:27 IST

'सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत'

कणकवली: सोन्याचा चमचा तोंडात घेवून जन्माला आलेल्या नितेश राणे यांना गरिबीचे चटके बसलेले नाहीत. त्यामुळे त्यांना कुणबी आरक्षणाची किंमत कळणार नाही. मराठा समाज नेते मनोज जरांगे - पाटील यांनी समाजाला शैक्षणिक, नोकरी आणि राजकीय असे कुणबी म्हणून सरसकट आरक्षण मिळावे, ही भूमिका घेवून १७ दिवस उपोषण केले होते. नितेश राणेंनी मराठा समाजासाठी निदान १७ तास तरी उपोषण करावे.फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी मराठा आरक्षणाबाबत बोलू नये असा सल्ला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी दिला आहे.तसेच आता राजकीय आरक्षण मिळाले आणि  कणकवली विधानसभा मतदारसंघ कुणबी मराठा यांच्यासाठी राखीव झाल्यास नितेश राणे हे त्याचा फायदा घेण्यासाठी कुणबी प्रमाणपत्र काढण्यासाठी पहिले जातील. काँग्रेसमध्ये असताना जे नितेश राणे फडणवीसांचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देणार नाही असे म्हणत होते.ते आता  स्वतःच्या स्वार्थासाठी आपली भूमिका बदलत आहेत. मराठा आणि कुणबी मराठा यांच्यात स्वतःच्या स्वार्थासाठी नितेश राणेंनी भेद करु नये. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजेश रावराणे, सिध्देश रावराणे उपस्थित होते. सावंत म्हणाले, मराठा समाजातील गरिबीचे चटके बसणाऱ्या लोकांना आरक्षण हवे आहे.ज्या मुलांना आरक्षणामुळे उच्च शिक्षण घेताना शैक्षणिक प्रवेश मिळत नाहीत .त्या मुलांसाठी शैक्षणिक आरक्षण महत्त्वाचे आहे.त्यामुळे कणकवली विधानसभा मतदारसंघ जर कुणबी मराठा समाजासाठी  आरक्षित झाला तर नितेश राणे काय करणार ? हे त्यांनी जाहीर करावे. मनोज जरांगे- पाटील यांच्या भूमिकेला मोठा पाठिंबा मिळत आहे.त्यांच्या सभांना लाभणारा प्रतिसाद मोठा आहे.त्यामुळे राणे यानी त्यांच्यासारखीच जाहीर सभा घ्यावी,त्यात मराठा आणि कुणबी मराठा आरक्षणावर भूमिका मांडावी, म्हणजे त्यांना समाजाचा प्रतिसाद समजेल.जरांगे पाटील यांची लवकरच जिल्ह्यात सभा !मनोज जरांगे पाटील यांची सिंधुदुर्गात सभा होण्यासाठी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष ऍड. सुहास सावंत आणि सिताराम गावडे हे प्रयत्न करत आहेत.असे सतीश सावंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Maratha Reservationमराठा आरक्षण