शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नितेश राणेंनी जनतेच्या मनातील 'दहा प्रश्नांची' उत्तरे द्यावी!, सुशांत नाईक यांचे आव्हान

By सुधीर राणे | Updated: October 5, 2023 16:03 IST

आमदार नितेश राणे रोज पत्रकार परिषद घेतात. त्यांनी दररोज एका प्रश्नाचे उत्तर जनतेला द्यावे

कणकवली: पडवे येथे आपले वैद्यकीय महाविद्यालय उभारले, पण कणकवलीतील शासकीय रुग्णालय अद्ययावत कधी होणार? तसेच आमदार म्हणून गेल्या ९ वर्षात कणकवली मतदार संघात कोणती विकास कामे केली? ते आमदार नितेश राणे यांनी सांगावे. जनतेच्या मनातील दहा प्रश्नांची उत्तरे त्यांनी द्यावीत असे आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी दिले आहे. कणकवली येथील विजय भवन येथे गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी राजू राठोड, मुकेश सावंत, अमेय जठार, उमेश मेस्त्री, तेजस राणे, सिध्देश राणे, बंटी उरणकर, संदेश सुतार, सागर गोरुले, मयूर दळवी, नंदू परब आदी युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.सुशांत नाईक म्हणाले, आमदार नितेश राणे रोज पत्रकार परिषद घेतात. आता त्यांनी आम्ही विचारलेल्या १० प्रश्नांची उत्तरे द्यावीत. दररोज एका प्रश्नाचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे. त्यांनी आपल्या कुटुंबाचे फायद्याचे असलेले पडवे येथील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पूर्ण केले. परंतु कणकवली मतदारसंघातील अविकसीत शासकिय रुग्णालयामधून रुग्णांना चांगली सेवा कधी मिळणार? कुडाळ, मालवण सारखा कणकवली विधानसभा मतदारसंघातील  एसटी बसस्थानकांचा विकास का झाला नाही ? आपण जाहीर केलेल्या कणकवली येथील ए.जी.डॉटर्स कचरा प्रक्रीया प्रकल्पाचे काय झाले? देशाचे उद्योगमंत्री असलेल्या त्यांच्या वडिलांनी कणकवली मतदारसंघातील जनतेसाठी किती उद्योग आणले ? किती लोकांना रोजगार दिला? गेली ९ वर्ष आमदार असूनही देवगड शहराचा पाणी प्रश्न का सुटला नाही? २५ वर्ष त्यांचे वडील व ते सत्तेत असताना त्यांच्या गावातील वरवडे प्राथमिक आरोग्य केंद्राचा प्रश्न का सुटू शकला नाही ?सिंधुदुर्ग जिल्ह्याला जोडणाऱ्या गगनबावडा व फोंडाघाट रस्त्यांचा प्रश्न ते अद्याप का सोडवू शकले नाहीत? प्रक्षोभक वक्तव्ये करुन सामाजिक एकोपा बिघडवण्याचे त्यांचे प्रयत्न का असतात ? औषध आपल्या दारी, मोफत वायफाय, रिव्हर राफ्टींग, सिंधुदुर्ग गाईड अशा जाहीर केलेल्या योजना आता चालू का नाहीत? त्यांचे वडील मराठा मंडळ कणकवलीचे १७ वर्ष अध्यक्ष आहेत. महाराष्ट्रभर आपण स्वतः मराठा समाजाचे नेते म्हणून फिरता. मग कणकवली मराठा मंडळाचे काम अजून अपूर्ण का? या प्रश्नांची उत्तरे नितेश राणे यांनी द्यावीत. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे KankavliकणकवलीPoliticsराजकारण