शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
4
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
5
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
6
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
7
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
8
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
9
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
10
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
11
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
12
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
13
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
14
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
15
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
16
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
17
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
18
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
19
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
20
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?

कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी सेवा देणार, नितेश राणेंनी दिली माहिती

By सुधीर राणे | Updated: July 10, 2023 16:18 IST

कणकवली : माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यावेळी मी विरोधी पक्षात ...

कणकवली: माझ्या आमदारकीच्या ९ वर्षाच्या कालावधीत कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्यात आली नाहीत. त्यावेळी मी विरोधी पक्षात असल्याने सरकारकडे मागणी करुनही डॉक्टर आणि रिक्त पदे भरली नाहीत. आता सरकार आमचे आहे. रिक्त पदे भरण्यासाठी माझा पाठपुरावा सुरू आहे. तोपर्यंत वैद्यकीय सेवा देणाऱ्या एका संस्थेच्या माध्यमातून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात १२ कर्मचारी मंगळवार पासून सेवा देणार आहेत अशी माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली. तसेच रुग्णांना सेवा देताना आता कोणतीही कारणे चालणार नाहीत असा इशारा वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागनाथ धर्माधिकारी यांना दिला. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राणे म्हणाले, कणकवली उपजिल्हा रुग्णालयातील समस्यांबाबत आढावा घेतला होता. रुग्णांना सेवा का मिळत नाही?उपचारासाठी आलेल्या रुग्णांना ओरस किंवा अन्य ठिकाणी पाठवले जाते. याबाबत विचारले असता येथील आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वर्ग ४ ची रिक्त पदे आणि लिपिक वर्ग कर्मचाऱ्यांची गरज येथे असल्याचे सांगितले होते. त्यानुसार सरकारकडून रिक्त पदांची भरती होईपर्यंत एका खासगी संस्थेशी आपण संपर्क केला. त्या संस्थेमार्फत ४ कनिष्ठ लिपिक आणि ८ चतुर्थ श्रेणी कर्मचारी अशा १२ जणांची नेमणूक करण्यात आली आहे. ते मंगळवार पासून सेवा देतील. जनतेला दिलासा देण्याच्या दृष्टीने हा निर्णय शासकीय प्रक्रियेच्या बाहेर जाऊन घेण्यात आला असल्याचे राणेंनी सांगितले.नेमणूक करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार संबंधित संस्थाच देणार आहे. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा केली आहे. आम्ही सगळी मदत करीत आहोत. मात्र, डॉ.धर्माधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन आता काम केले पाहिजे. यापुढे तक्रारी चालणार नाहीत. लवकरच कणकवली उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना दर्जेदार सेवा देण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न राहतील असेही ते म्हणाले.

यावेळी पत्रकार परिषदेस डॉ.नागनाथ धर्माधिकारी,  जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, भाजप तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, शहराध्यक्ष अण्णा कोदे , कलमठ सरपंच संदीप मेस्त्री आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवलीhospitalहॉस्पिटलNitesh Raneनीतेश राणे