शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है, नितेश राणेंचे आदित्य ठाकरेंवर टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: November 23, 2023 11:48 IST

संघटना खिळखिळी होते तेव्हा खळा बैठकांशिवाय पर्याय नाही

कणकवली : खळा बैठका आणि आदित्य ठाकरे यांचा कोकण दौरा व गोवा येथे सुरू असलेला फिल्म फेस्टिव्हल याचे काय कनेक्शन आहे ? सिंधुदुर्ग जिल्ह्यावर आदित्य ठाकरे यांचे खरेच प्रेम आहे की, गोव्याच्या फिल्म फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावून, बॉलीवूडच्या लोकांसोबत त्यांना पार्टी करायची आहे. 'सिंधुदुर्ग तो बहाणा है, पेंग्विन को गोवा मे बॉलिवूड के ॲक्टरोंके साथ नाचना है! अशी टीका आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच ज्यांची संघटना खिळखिळी झाली, त्यांना खळा बैठकांशिवाय दुसरा पर्याय नाही, असेही ते म्हणाले.कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी बुधवारी आमदार नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, गांधी कुटुंबीयांवर झालेल्या कारवाईचे समर्थन करणे म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखे आहे. संजय राऊत ते करत आहेत. राहुल गांधी यांनी पनवती या शब्दावर मोठं वक्तव्य करण्याचे धाडस केले आहे. १९ नोव्हेंबर रोजी इंदिरा गांधी यांची जयंती होती. मग, भारत त्यादिवशी जिंकलाच पाहिजे होता. पण, खरी पनवती कोण ? गेल्या ७० वर्षात देशात गांधी कुटुंबाची जी पनवती लागलेली होती ती नरेंद्र मोदी यांनी सत्ता बदल करून दूर केली आहे.'फादर ऑफ द नेशन' कसा असतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगाला दाखवून दिले आहे. क्रिकेटची मॅच संपल्यानंतर उपविजेत्या ठरलेल्या भारतीय संघाच्या प्रत्येक खेळाडूला भेटून त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. याउलट राहुल गांधींचे असून, त्यांना देशप्रेम कधीच कळणार नाही.

ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची संपत्ती जप्त होणारज्यांनी ज्यांनी भ्रष्टाचार केला आहे, त्यांची संपत्ती जप्त होणार. ज्या डॉक्टर महिलेच्या घरावर दारूच्या बाटल्या मारल्या, त्यांना त्रास दिला. छळले, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी गृह मंत्रालयाला अधिवेशनात करणार आहे. गृहमंत्री आणि त्यांचे खाते कसे आहे, ते संजय राऊत यांना लवकरच कळेल, असेही आमदार राणे म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गPoliticsराजकारणAditya Thackreyआदित्य ठाकरेNitesh Raneनीतेश राणे