कृषी विभागाच्या नव्या सहा योजना

By Admin | Updated: April 23, 2015 00:43 IST2015-04-22T21:54:05+5:302015-04-23T00:43:13+5:30

पशुसंवर्धन समितीची सभा : वाढीव अनुदानातून निधी

The new six plan of Agriculture Department | कृषी विभागाच्या नव्या सहा योजना

कृषी विभागाच्या नव्या सहा योजना

सिंधुदुर्गनगरी : महिला सबलीकरणाच्यादृष्टीने ९० टक्के अनुदानावर ५० कुक्कुटपालनाचा गट व पशुखाद्य, कुक्कुटपालन व्यवसाय चालनासाठी लघु अंडी उबवणी संयंत्र यांसह नव्याने सहा योजना सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात
सुरू करण्यात येणार आहे. या योजना जिल्हा परिषदेच्या वाढीव अनुदानातून राबविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष, पशुसंवर्धन सभापती रणजित देसाई यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन समितीची सभा येथील बॅ. नाथ पै सभागृहात सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.यावेळी जिल्हा परिषद सदस्या सुचिता वजराठकर, समिती सचिव डॉ. एस. चंदेल, अधिकारी, खातेप्रमुख उपस्थित होते.पशुसंवर्धन विभागाचा २०१४-१५ या आर्थिक वर्षाचा निधी १०० टक्के खर्च झाला असून, सन २०१५-१६ या चालू वर्षात एक लाख रुपये आदा; पाणी तोडण्याची कारवाई लांबणीवर, एक कोटी ३० लाख ७० हजार रूपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. तसेच १ कोटी ६० लाख रूपये पशुवैद्यकीय दवाखाना दुरूस्ती, ४७ लाख औषधे घेण्यासाठी १५ लाख कुक्कुटपालन व २२ लाख रूपये वैरण विकासासाठी वापरण्यात येणार आहेत. विशेष घटक योजनेमधून पशुखाद्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच या आर्थिक वर्षात पशुसंवर्धन विभागासाठी दोनकोटी २५ लाखपर्यंत मागणी राहणार असल्याची माहिती उपाध्यक्ष देसाई यांनी दिली. (प्रतिनिधी)

महिला सबलीकरणासाठीच्या योजना
महिलांसाठी ९० टक्के अनुदानावर एकदिवसीय ५० कुक्कुट पिलांचा गट व एक महिन्याचे खाद्य पुरविणे.
दुधाळ जनावरांच्या गोठ्यामध्ये ७५ टक्के अनुदानावर रबरी मॅट देणे, लाभार्थ्यांना १० लिटर्सची फायबरची किटली, १० किलोचे घमेले व फावडे असा सेट ९० टक्के अनुदानावर देणे, ही योजना २०० लाभार्थ्यांसाठी मर्यादीत आहे.
हायड्रोकोनिक चारा निर्मितीअंतर्गत ७५ टक्के अनुदानावर पाच गटांना ८० हजार रूपये देणे.
मुरघास निर्मितीसाठी ९० टक्के अनुदानावर २०० बॅग्ज पुरविणे.
कुक्कुटपालनासाठी ७५ टक्के अनुदानावर लघु अंडी उबवणी संयंत्र देणे.

Web Title: The new six plan of Agriculture Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.