शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: १५ हजारांची लाच स्वीकारताना नेरूर वनपाल जाळ्यात, लाकूड परवाना पाससाठी लाचेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 11:53 IST

कुडाळ : लाकूडतोडीचा वाहतुकीसाठीचा पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच लाकूड व्यावसायिकाकडून स्वीकारताना नेरुरपारचे वनपाल अनिल हिरामण राठोड (४९) ...

कुडाळ : लाकूडतोडीचा वाहतुकीसाठीचा पास देण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच लाकूड व्यावसायिकाकडून स्वीकारताना नेरुरपारचे वनपाल अनिल हिरामण राठोड (४९) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. ही कारवाई शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी ११:४५ वाजता नेरूर वनपाल यांच्या कार्यालयात करण्यात आली, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली. या घटनेनंतर वनविभागात एकच खळबळ उडाली आहे.तक्रारदार हे लाकूड व्यावसायिक असून नेरूरपार वनपाल यांचे कार्यालयात लाकूड वाहतुकीचा पास मिळावा यासाठी त्यांनी १५ फेब्रुवारी रोजी अर्ज केला होता. लाकूडतोडीसह पास देण्यासाठी वनपाल यांनी तक्रारदार यांच्याकडे २० हजार रुपयांची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती १५ हजार रुपये स्वीकारण्याचे राठोड यांनी मान्य केले होते.या प्रकरणी संबंधित लाकूड व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्ग यांचेकडे २९ फेब्रुवारी रोजी तक्रार केली होती. या तक्रारीनुसार शुक्रवारी सकाळी रोजी ११:४५ वाजण्याच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सिंधुदुर्गच्या पथकाने नेरूर वनपाल कार्यालय येथे सापळा रचला. तक्रारदाराकडून वनपाल राठोड यांना १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरूही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग ठाणे परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील लोखंडे, अपर पोलिस अधीक्षक महेश तरडे, सुधाकर सुराडकर, सिंधुदुर्गचे पोलिस उपअधीक्षक अरुण पवार यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यात पोलिस निरीक्षक अमित पाटील, शिवाजी पाटील, सहायक पोलिस उपनिरीक्षक भार्गव फाले, पोलिस हवालदार जनार्दन रेवंडकर, नीलेश परब, प्रथमेश पोतनीस, रविकांत पालकर, कांचन प्रभू, जितेंद्र पेडणेकर यांनी सापळा रचला.तक्रारदार यांचेकडून १५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना वनपाल राठोड यांना रंगेहाथ पकडले. वनपाल राठोड यांना ताब्यात घेण्यात आले असून सांयकाळी उशिरापर्यंत या प्रकरणी तपास काम व यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याची पुढील कार्यवाही सुरू होती.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारीforest departmentवनविभाग