समाजाला दिशा देण्याची गरज : लियाकत शाह
By Admin | Updated: October 29, 2014 00:11 IST2014-10-28T23:49:40+5:302014-10-29T00:11:28+5:30
सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक

समाजाला दिशा देण्याची गरज : लियाकत शाह
चिपळूण : ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाला खऱ्या अर्थाने दिशा देण्याची गरज आहे. आरोग्य, शिक्षण, क्रीडा आदींसह अन्य सुविधा समाजाला मिळाल्या पाहिजेत, या दृष्टीने सर्वांनीच प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत चिपळूण तालुका मुस्लिम असोसिएशनचे अध्यक्ष व उपनगराध्यक्ष लियाकत शाह यांनी येथे व्यक्त केले.
शहरातील कोकण पॅलेस येथे आयोजित करण्यात आलेल्या संघटनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे संस्थापक इकबाल मुकादम, शब्बीर अलवी, नगरसेवक इनायत मुकादम, पाणी पुरवठा सभापती कबीर काद्री, मुश्ताक बेबल, सादिक रुमाणे, इमदाद चौगुले, अब्दुल्ला मुकरी, समीर दलवाई, नासिर शेख, सज्जाद काद्री, फैय्याज देसाई, माजी नगरसेवक महमद फकीर, नासिर चौगुले, रियाज रुमाणे, जमालुद्दिन बंदरकर, अस्लम देसाई, अश्फाक कासकर, मुराद अडरेकर, बिलाल देसाई आदींसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
चिपळूण तालुक्यातील शेवटच्या घटकापर्यंत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोहोचले पाहिजे. समाजातील समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यावर अधिक भर दिला जाणार आहे. सरकारी योजना समजावून सांगून त्या योजनांचा जास्तीत जास्त समाजातील घटकाला कसा लाभ होईल, याकडेही लक्ष दिले जाणार आहे. संघटनेच्या कार्यात प्रत्येकाने हातभार लावावा, असे आवाहनही शाह यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उस्मान बांगी यांनी केले. मुराद अडरेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)