शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 16:46 IST

गणेशोत्सवानंतर सुरु झालेला पितृपक्ष पंधरवडा आता संपला आहे. त्यामुळे आता कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाईला आनंद देणा-या नवरात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने आदिमायेचा जागर केला जाणार आहे. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवाचे निमित्त सिंधुदुर्गात आता होणार आदिमायेचा जागरदांडिया स्पर्धा रंगणार; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल, तरुणाई सज्ज

सुधीर राणे

कणकवली : गणेशोत्सवानंतर सुरु झालेला पितृपक्ष पंधरवडा आता संपला आहे. त्यामुळे आता कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणाईला आनंद देणा-या नवरात्रोत्सवाला बुधवार पासून प्रारंभ होणार आहे. संपूर्ण जिल्ह्यात नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झाली असून त्यानिमित्ताने आदिमायेचा जागर केला जाणार आहे. या उत्सवासाठी तरुणाई सज्ज झाली आहे.नवरात्रोत्सवाची नऊ दिवस चालणारी ही धूम एक वेगळेच वातावरण निर्माण करीत असते . सिंधुदुर्गात यावर्षी गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. अनंत चतुर्दशीनंतर पितृपक्ष सुरु झाल्याने पितरांच्या श्राध्दाचे आयोजन अनेक ठिकाणी करण्यात आले होते. त्याचबरोबर या कालावधीत नवरात्रोत्सवाची जोरदार तयारी करण्यात येत होती. दांडिया नृत्य तसेच इतर सांस्कृतिक कार्यक्रमांच्या तालमी रंगत होत्या.नवरात्रोत्सवात जिल्हयामध्ये सार्वजनिक तसेच खासगी ठिकाणी श्री दुर्गा देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे, तर अनेक ठिकाणी नुसतेच गरबा आणि दांडियाचे आयोजन करण्यात आले आहे.कोकणामध्ये पूर्वी ग्रामदेवतांच्या मंदिरांपुरताच घटस्थापना करण्यापर्यंत नवरात्रोत्सव मर्यादित होता. मात्र, काळानुसार त्यात आता बदल होत आहेत. ग्रामदेवतांच्या मंदिरांमध्ये घटस्थापना करण्याबरोबरच एखाद्या वाडीवस्तीवर देवीची मूर्ती आणून तिची स्थापना करून, दांडियाचे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. तर काही ठिकाणी देवीची प्रतिष्ठापना न करताच दांडिया,गरबा खेळला जात असल्याचे चित्र पहायला मिळते.शहरांमध्ये मात्र गल्लोगल्ली नवरात्रोत्सव साजरा करण्याचे प्रमाण वाढत आहे. राजकीयदृष्टया जनतेच्या जवळ जाणारा हा उत्सव असल्याने राजकारणीही मोठय़ा संख्येने या उत्सवांना मदतीचा सढळ हस्ते हात देत असल्याचे दिसून येते.पारंपारिक पध्दतीने गरब्याचे आयोजन प्रामुख्याने गुजराती वस्ती असणा-या ठिकाणीच मोठया प्रमाणात होत असते. मात्र ,जिल्हयातील प्रमुख शहरांसह काही पंचक्रोशींच्या ठिकाणीही असे कार्यक्रम अलीकडे केले जात असल्याचे दिसून येते.

कणकवली शहरातही मागील काही वर्षात नवरात्रोत्सव मोठया प्रमाणावर साजरा करण्याची प्रथा सुरू झाली आहे. नवरात्रोत्सव मंडळांसह अनेक ठिकाणी दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असल्याने या उत्सवाची रंगत आणखी वाढत आहे.दांडिया स्पर्धेत विशेष करून युवा पिढीचा सहभाग अधिक असल्याने राजकीय मंडळीही या उत्सवाचा राजकीय फायदा करून घेण्यास पुढे सरसावत असल्याचे दिसून येते. त्यामुळे या स्पर्धांची भव्यता आणखीनच वाढते.सिंधुदूर्गातील अनेक मंदिरात दसऱ्या पर्यन्त देवीचा जागर केला जाणार आहे. भजन, पूजन आदी धार्मिक विधि यानिमित्ताने होणार आहेत. त्याची तयारी सध्या सुरु आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी पोलिस प्रशासनाने तयारी केली आहे. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून नवरात्रोत्सवाच्या नऊ रात्री आता जागविल्या जाणार आहेत.बाजारपेठांमध्ये साहित्य दाखल!नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने लागणारे साहित्य बाजारपेठेत दाखल झाले आहे. या उत्सवाच्या निमित्ताने रंगणाऱ्या दांडिया, गरबा तसेच इतर कार्यक्रमाच्या वेळी इतरांपेक्षा आपला 'लुक' वेगळा असावा यासाठी तरुणाई प्रयत्न करताना दिसत आहे. त्यामुळे त्यांचा कल तसेच आवड़ बघुन विविध स्टाईलचे कपड़े तसेच साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीsindhudurgसिंधुदुर्ग