शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हंटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
4
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
5
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
6
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
7
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
8
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
9
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
10
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
11
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
12
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
13
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
14
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
15
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
16
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
17
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
18
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
19
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?

नौदल दिन: चित्तथरारक कसरतींनी भारतीय नौदलाने जिंकली मने, मिसाइलद्वारे हल्ला ठरले आकर्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2023 12:12 IST

समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडीचा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव

संदीप बोडवेमालवण: भारतीय नौदलाच्या पश्चिम कमांडकडून बुधवारी सायंकाळी विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. या मध्ये प्रामुख्याने समुद्रातील बचाव कार्य, घात लावून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडी चा शोध घेणे, युद्धनौकेवरून मिसाइल डागणे यासह अनेक प्रात्यक्षिकांचा सराव करण्यात आला. नौदलाच्या जवानांचा आजचा सराव पाहण्यासाठी तारकर्लीच्या किनारपट्टीवर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाच्या परिसरात सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता.सराव प्रात्यक्षिकांच्या सुरुवातीला मरीन कमांडोनी विमानातून खाली उडी मारत पॅराशुट द्वारे जमिनीवर उतरण्याचे कसब दाखवले. या नंतर समुद्रात संकटात सापडलेल्या मच्छीमारांना तसेच सैनिकांना वाचविण्यासाठी धनुष हेलिकॉप्टरचे आगमन झाले. या हेलिकॉप्टर मधून मदतीची वाट पाहणाऱ्या मच्छीमार आणि सैनिकांना हवेतल्या हवेत एअरलिफ्ट करण्यात आले. आणि त्यांना सुरक्षित स्थळी उतरविण्यात आले. त्यानंतर समुद्रात घात लावून पाण्यात लपून बसलेल्या दुश्मनांच्या पाणबुडी चा शोध घेण्यासाठी ए एस डब्ल्यू हेलिकॉप्टरने सोनार बॉडीला समुद्राच्या पाण्यात सोडत दुष्मनाची पाणबुडी सोधण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. मोठ्या धमाक्यासह शत्रूची चौकी उध्वस्त..

  • आजही नौदलाच्या आयएनएस कोलकाता, तलवार, ब्रह्मपुत्रा, सुभद्रा, यांसह आयएनएस बेतवा आदी युद्ध पोतांनी तारकर्लीच्या समुद्रात संचलन केले. यावेळी आयएनएस बेतवा वर सी किंग हेलिकॉप्टर यशस्वीपणे उतरविण्याचा यशस्वी डेमो करून दाखवण्यात आला. आजच्या दिवसाचे आयएनएस खंडेरी आकर्षण ठरले. 
  • प्रात्यक्षिकांच्या अखेरीस भारतीय नौदलाच्या जवानांनी समुद्रात रबरी बोटीच्या सहाय्याने येत दुश्मनांची चौकीला बॉम्ब च्या साह्याने उडून दिले. हा जबरदस्त धमाका पाहून नागरिक अचंबित झाले होते. 
  • ध्रुव, चेतक, सी किंग या हेलिकॉप्टर बरोबर तेजस, डॉर्नियर, मिग 29 के आदी लढाऊ विमानांनी आपल्या कसरती दाखविल्या. सरते शेवटी सनसेट सेरेमनी संपन्न झाली यावेळी राष्ट्रगीताची धून वाजविण्यात आली. त्याचप्रमाणे सारे जहासे अच्छा हिंदोस्ता हमारा या गीताचीही धुन वाजविली. त्यानंतर समुद्रात नौदलाच्या युद्ध नौकांवरील रोषणाई सुरू झाली. ही रोशनाई आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. 
  • नौदलाच्या आजच्या दिवसाच्या कसरतींचा सराव पाहण्यासाठी तारकर्ली येथे नागरिकांनी मोठी गर्दी केली होती कार्यक्रम स्थळाच्या दोन्ही बाजूला सुमारे दीडशे मीटर लांब या नागरिकांना थांबविण्यात आले होते या ठिकाणी नागरिकांना आवरण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्गindian navyभारतीय नौदल