शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

नाटळ-कनेडी पुलाला 6 कोटीची मंजुरी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 17:33 IST

Sindhudurg flood UdaySamant Sindhudurg :  नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली.

ठळक मुद्देनाटळ - कनेडी पुलाला सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून 6 कोटीची मंजुरी मिळणारपालकमंत्री उदय सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी थेट साधला संपर्क

सिंधुदुर्ग :  नाटळ - कनेडी पुलाच्या कामासाठी सहा कोटी निधीला मंजुरी मिळणार आहे. पुढच्या पावसाळ्यापूर्वी पूल सुरु केला जाईल. दरम्यानच्या कालावधीत पर्यायी पुलासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत आणि खासदार विनायक राऊत यांनी आज चिपळूण येथून थेट सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याशी फोनवरून चर्चा केली.जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची काल केलेल्या पाहणी दौऱ्यानंतर पालकमंत्री उदय सामंत यांनी आढावा बैठका घेतल्या होत्या. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत आणि खासदार राऊत यांनी आज चिपळूण येथे पूरग्रस्त भागातील प्राधान्याने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा केली. यामध्ये विशेषतः खारेपाटण येथील पर्यायी मार्गासाठी 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला.

खारेपाटण येथील खाडीला पत्तन विभागाच्या माध्यमातून संरक्षक भिंत उभारण्यात येत आहे. या भिंतीची उंची वाढवण्यासाठी जिल्हा नियोजनमधून 50 लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता म.श्री. कदम यांनी नरडवे - पामतेल येथील के.टी. वेअरची पाहणी केली असून या के.टी.वेअरला संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.तिलारी कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटी; निविदा प्रक्रिया राबवाजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तिलारी येथील कॅनॉल दुरुस्तीसाठी 35 कोटीचा निधी मंजूर केला आहे. याबाबत लवकरात लवकर निविदा प्रक्रिया राबवून हे काम पूर्ण करण्याची सूचना पालकमंत्री श्री सामंत यांनी अधिक्षक अभियंत्यांना दिली. तिलारी प्रकल्प हा सद्यःस्थितीत अंतिम टप्प्यात असून प्रकल्पाचे कालवे पूर्ण होऊन सुमारे 30 - 35 वर्षे कालावधी झाला आहे.

हे कालवे प्रामुख्याने मऊस्तर मातीमधून गेल्यामुळे सन 2019 - 20 च्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये क्षतीग्रस्त झाले होते. ज्या ठिकाणी डोंगर कडा ढासळून कालव्यातील प्रवाह बंद होतो, त्या ठिकाणी क्षेत्रीय परिस्थितीनुसार मंजुषा पेटीचे बांधकाम करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम करणे, तसेच कालवा गळतीच्या ठिकाणी कालवा अस्तरीकरण करणे अशा प्रतिबंधक उपाययोजनेच्या नवीन व दुरुस्तीच्या कामांसाठी सुमारे 35 कोटी च्या रकमेची मागणी शासनस्तरावर करून पाठपुरावा करण्यात आला होता.

खासदार  राऊत हे पूरग्रस्तांच्या मदतीसाठी चिपळूण येथे स्वतः थांबून यंत्रणा राबवित आहेत. पूरग्रस्त भागात करावयाच्या कामांबाबत प्राधान्य देण्यासाठी आज त्यांच्यासोबत चर्चा झाली. पुढील दौऱ्यात बांदा, तिलारी येथील पाहणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर चिपी विमानतळाच्या अनुषंगानेही बैठक घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

टॅग्स :floodपूरUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्गAshok Chavanअशोक चव्हाण