शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

देशाचा मूड मोदींसोबत, त्यामुळे राणेंचाच विजय; दीपक केसरकर यांनी व्यक्त केला विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:04 IST

१ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित

सावंतवाडी : देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. मोदींमुळे भारत बलवान देश बनणार आहे. त्यामुळेच रत्नागिरी - सिंधुदुर्ग मतदारसंघातून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. सावंतवाडी येथे मंत्री दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी, मुलगी आणि जावई सोबत होते.यावेळी मंत्री केसरकर म्हणाले, देशाचा मूड हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहे. यापुढेही देश मोदींसोबतच राहणार असून, भारत बलवान देश बनणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा पवित्र हक्क बजावला पाहिजे. लोकशाही अधिक बळकट करावी, असे आवाहन ही मंत्री केसरकर यांनी केले.कोकण एका विकासाच्या दिशेने जात आहे. शेतकरी, महिला व युवक यांचा विकास हा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे सर्वांनी विकासाला मत दिले आहे. सावंतवाडी मतदारसंघातून ७० हजारपेक्षा अधिकचे मताधिक्य राणेंना मिळेल. १ लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने केंद्रीय मंत्री नारायण राणेेंचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला.यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, कन्या सोनाली केसरकर - वगळ, जावई सिद्धार्थ वगळ, नातू अर्जुन वगळ, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शुभांगी सुकी, मनोज नाईक, बंटी पुरोहित आदी उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गratnagiri-sindhudurg-pcरत्नागिरी-सिंधुदुर्गlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४Deepak Kesarkarदीपक केसरकर Narayan Raneनारायण राणे