शहरं
Join us  
Trending Stories
1
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
4
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
5
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
6
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
7
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
8
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
9
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
10
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
11
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
12
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
13
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
15
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
16
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
17
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
18
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
19
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
20
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता

Narayan Rane: 'तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला', राणेंनी सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2021 12:23 IST

Narayan Rane: "शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता"

Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेनेतील वाद काही केल्या थांबताना दिसत नाही. दररोज दोन्ही बाजूनं एकमेकांवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आज नारायण राणे यांनी शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये केलेल्या कामाची आठवण शिवसेनेला करुन दिली. ते कणकवलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. 

 'अजित पवार अज्ञानी, ते फक्त चौकशी टाळण्यात हुशार'; राणेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

"संजय राऊत आज शिवसेनेची वाट लावत आहेत. ते पक्षाला खड्ड्यात नेत आहेत. आज माझ्यावर टीका केल्या जात आहेत. पण याच शिवसेनेच्या जडणघडणीमध्ये माझाही वाटा आहे हे तुम्ही नाकारू शकत नाही", असं नारायण राणे म्हणाले. 

संजय राऊतांमुळे शिवसेना खड्ड्यात; 'सामना'वर 'प्रहार' करणार; नारायण राणेंचा हल्लाबोल

राणेंना सांगितला बाळासाहेबांच्या अज्ञातवासाचा किस्सा"शरद पवारांनी बाळासाहेबांना फोन करुन मातोश्री सोडण्याचा सल्ला दिला होता. दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली होती. तेव्हा बाळासाहेबांनी पहिला फोन मला केला होता आणि नारायण जसा असशील तसा निघून ये असं सांगितलं. मी जिथं जाईन तिथं माझ्या पुढे आणि मागे तुझ्या गाड्या असल्या पाहिजेत अशी जबाबदारी मला दिली होती. बाळासाहेब तेव्हा काही दिवस अज्ञातवासात होते आणि त्यांना मी सुरक्षा देत होतो. त्यांच्या सुरक्षेसाठी मी १५ दिवस अंघोळ वगैरे न करता.. जे मिळेत खाऊन आणि गाडीतच झोपत होतो. रात्रभर मच्छरांचा त्रास सहन करत होतो. पण हे सारं बाळासाहेबांवरील प्रेमापोटी आम्ही केलं होतं", असं नारायण राणे म्हणाले. 

शिवसेनेत केलेल्या कामाचा दाखला आणि आठवणी सांगत राणेंनी यावेळी पक्षाच्या आजच्या अस्तित्वात असलेलं त्यांचं योगदान दाखवून देण्याचा प्रयत्न केला. तसंच संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. 

"संजय राऊतांना पक्षात काही स्थान नाही. ना ते संपादक, ना त्यांच्याकडे कोणतं खातं, ना कोणतं पद. त्यांच्या लेखांना आणि विधानांना कुणी फारसं महत्त्व देत नाही. त्यांना फक्त बोलण्यापुरतं शिवसेनेनं जवळ ठेवलं आहे", असा हल्लाबोल राणेंनी यावेळी केला. 

संदुक कसली उघडताय? रोखठोक काय ते बोलातुम्ही कुंडल्यांची भाषा करत असाल तर आम्ही देखील संदुक उघडू, मग त्यातून काय काय बाहेर येईल याचा विचार करा, असं विधान संजय राऊत यांनी केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना राणेंनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. "एवढे दिवस मी धू धू धुतोय तुम्हाला मग अजून शांत काय बसला आहेत. संदुक उघडायला कुणी थांबवलंय तुम्हाला? संजय राऊतांना शिवसेनेत काही स्थान नाही. त्यांच्या लिखाणाला जास्त कुणी महत्त्व देत नाही. ना सामनाचा संपादक, ना धड प्रवक्ता. त्यांना फक्त बोलायला जवळ ठेवलंय", असं नारायण राणे म्हणाले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Balasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरेShiv Senaशिवसेना