शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane: आता राज्यातील सत्ता मिळवणे हेच लक्ष्य, पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असेल - नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2022 06:39 IST

Narayan Rane :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. 

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आम्ही जिंकली आहे. आता आमचे लक्ष्य महाराष्ट्राच्या सत्तेकडे आहे. महाराष्ट्राला चांगल्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे. तो भाजपचाच असेल, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी येथे केले. तसेच आमदार नितेश राणे, माजी खासदार नीलेश राणे, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्यासह भाजपच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे जिल्हा बँकेवर यश मिळविता आल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत भाजपने विजय मिळविल्यानंतर मुंबईत असलेल्या राणे यांनी दुपारी हेलिकॉप्टरने कणकवली गाठून विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. तसेच ‘ओम गणेश’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. राजन तेली यांनी भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला असेल तर तो पक्षाच्या वरिष्ठांकडे दिला असेल. त्यामुळे ते त्याबाबत निर्णय घेतील आणि आम्हाला तो मान्य असेल. माझ्या गेल्या ५० वर्षांच्या कालावधीत अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात चार-चार दिवस लागतात हे मी प्रथमच पाहत आहे. कायद्याचा आधार घेऊन आम्ही नितेश राणे यांच्या अटकपूर्व जामिनाची प्रक्रिया करीत आहोत.

ज्यांना अक्कल आहे, त्यांच्या ताब्यात बँक नितेश, नीलेश यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी प्रचंड मेहनत घेतली. सर्व मतदारांचीही मोठी साथ मिळाली, त्यामुळे हा विजय मिळाला. ज्यांना अक्कल आहे त्यांच्या ताब्यात जिल्हा बँक आलेली आहे. 

काही जणांना निश्चितच बरोबर घेऊविरोधी पॅनलमधील काही जणांना ते आले तर निश्चितच आमच्या बरोबर घेऊ. काहीजण दूरध्वनीवरून आम्हाला संपर्क साधत आहेत, असा गौप्यस्फोट मंत्री राणे यांनी यावेळी केला.

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Kankavliकणकवली