शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

रिकामे असल्यानेच नारायण राणे पुड्या सोडतात, सरकारमधील मंत्र्यांची खोचक टीका 

By महेश गलांडे | Published: November 01, 2020 8:01 PM

आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले.

ठळक मुद्देसतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे.

सावंतवाडी : महाविकास आघाडीचे सरकार ३२ तारखेला पडेल, त्याची भाजपने वाट बघावी. आम्ही आमचे काम करत राहू, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांना विश्वासात घेऊन चांगलं काम करत असल्याने भाजपवाले खासगीतही मुख्यमंत्र्याचे कौतुक करतात. त्यामुळे आमच्या सरकारला पाच वर्षे भिती नाही. माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना आता काय काम उरले नसल्याने ते पुड्या सोडण्याचे काम करत आहेत, अशी जोरदार टिका महाराष्ट्राचे महसूल राज्यमंत्री अब्दूल सत्तार यांनी केली. ते  रविवारी आंबोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी माजी मंत्री दीपक केसरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, योगेश नाईक, अशोेक दळवी आदि उपस्थीत होते.मंत्री सत्तार म्हणाले, सिंधुदुर्गमध्ये वाळू माफिया असतील तर त्यांच्या विरोधात कडक धोरण राबवण्यात येणार असून, जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षक यांना सांगून त्यांच्यावर कारवाई केली जाईल पण कदापी अवैध वाळू उत्खनन चालू देणार नाही, असा इशारा मंत्री सत्तार यांनी दिला. वाळूचे दर निश्चीती लवकरच होणार आहे. याबाबतच्या बैठका सुरू आहेत. त्यामुळे हे दर शासनस्तरावर ठरवले जाणार आहेत. जांभ्या दगडाच्या उत्खननामुळे सरकारने परवानगी दिली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सतत विरोधक महाविकास आघाडीचे सरकार पडणार अशी टिका करतात त्यावर सत्तार यांनी आमचे सरकार ३२ तारखेला पडेल याची वाट बघावी कारण ३२ तारीख कधीही येणार नाही आणि आमचे सरकार पाच वर्षे टिकणार आहे. विरोधकांना आता कोणतेही काम शिल्लक राहिले नसल्याने ते पाडापाडीचे राजकारण करत आहेत. पण त्यांना ते यश येणार नाही. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे ज्या भाषेत टिका करत आहेत, ती भाषा निषेधार्थ आहे. ही भाषा महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी आहे. राणे आता कोणतेही काम उरले नाही. त्यामुळे प्रसिद्धीसाठीच ते पुड्या सोडतात, असा आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. आंबोली चौकुळ येथील समान जमिन वाटप या धोरणानुसार जमिनीचे वाटप केले जाणार आहे. त्याबाबत लवकरच मुख्यमंत्र्यांकडे बैठक होईल आणि त्यातून हा प्रश्न सुटेल असे मंत्री सत्तार यांनी सांगितले. तर चौकुळचा प्रश्न अद्याप सुटला नसून लवकरच प्रांताधिकारी व तहसिलदार हे गावात जाउन बैठक घेतील आणि तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवतील नंतरच त्यावर निर्णय होईल यासाठी मंत्रालय स्तरावर बैठक होणार असल्याचेही मंत्री सत्तारी यांनी सांगितले.

कुडाळ प्रांताधिकारी यांची पुन्हा चौकशी होणार

कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांची पुन्हा चौकशी होणार असून, आमदार वैभव नाईक यांनी तक्रार दिल्यानंतर एकदा त्यांची चौकशी झाली असून, त्या चौकशीवर कोणाचा विश्वास नसेल तर पुन्हा चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही मंत्री सत्तार यांनी सांगितले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Abdul Sattarअब्दुल सत्तारShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे