शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Narayan Rane : "मी मुंबईला होतो पण...", नारायण राणे वडीलांच्या आठवणीनं झाले भावूक; जागवल्या आठवणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2022 14:48 IST

आमदार नितेश राणे हे शेती करत असतनाचा नवा लूक दोन दिवसापूर्वी सर्वा समोर आला असतनाचा आता केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनीही सावंतवाडीतील पत्रकारांसमोर आपल्या आठवणी जागवल्या

अनंत जाधव -सावंतवाडी : आमदार नितेश राणे हे शेती करत असतानाचा नवा लूक दोन दिवसांपूर्वी सर्वांसमोर आला. आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही आपल्या शेतातील आठवणी सावंतवाडीतील पत्रकारांसमोर जागवल्या. राणे म्हणाले, आपल्याला वडिल आजारी असल्याचे पत्र आले की तरवा लावणीसाठी गावी याव लागायचं. हे सांगताना राणे चांगलेच भावनिक झालेले दिसून आले.

आमदार नितेश राणे हे कणकवली तालुक्यातील वरवडे या मूळ गावी शेती करताना दिसून आले. हा त्यांचा नवा शेतकरी लूक प्रथमच महाराष्ट्रा समोर आला. त्यानंतर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.  काही जणांनी तर हा दिखाऊपणा असल्याची टीकाही केली. 

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे शुक्रवारी सावंतवाडीत आले असता त्यांनी पत्रकारांसमोर वेगवेगळ्या विषयांवर आपली भुमिका मांडली. त्यावेळी त्यांना आमदार नितेश राणे हे शेती करताना दिसल्याबाबत विचारले असता त्यांनी यावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. मात्र त्यांना आवड आहे, म्हणून ते शेतात गेले, असे सांगत नीतेश राणे यांचे कौतुक केले. पण नंतर मात्र आपण शेतात जात होता का? असे विचारताच राणे थोडे भावनिक झाले. त्यांनी आपल्या आठवणीच जागवल्या. 

मी अठरा वर्षांचा असताना कामानिमित्त मुंबईला होतो. पण वडिल आजारी असले, की पत्र यायचे मग मुंबईतून कणकवली तालुक्यातील वरवडे या आपल्या गावी यायचो. त्यावेळी नांगरणीसह भात लावणीच्या कामात आपण मदत करायचो. शेतीच्या सगळ्याच कामांना मदत करत होतो. आता शेतीत जाणे होत नाही.

राणेंच्या या बोलण्यातून त्यांची भावनिकता दिसून आली. आपल्यालाही या सर्व गोष्टी करायला आवडायच्या. मात्र काळ, वेळ, कामधंदा यातून हे सर्व विसरायला लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे sindhudurgसिंधुदुर्गBJPभाजपा