शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

nanar refinery project: पक्ष बदलला की नितेश राणेंची तत्वे बदलतात, सतीश सावंत यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2022 13:59 IST

भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा. सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा असा पलटवारही त्यांनी केला.

कणकवली : रिफायनरी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या वादावरुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंवर टीकास्त्र सोडले आहे. नितेश राणेंनी काँग्रेस आणि स्वाभिमानमध्ये असताना रिफायनरी प्रकल्प रद्द करण्यास भाग पाडणार असा पवित्रा घेतला होता. त्यामुळे त्यांनी ग्रीन रिफायनरीबाबत आपल्या दुटप्पी भूमिकेबद्दल आधी सांगावे.पक्ष बदलला की तत्वे बदलणाऱ्या आणि पक्षाच्या रंगाप्रमाणे आपला रंग बदलणाऱ्या राणेंनी मतांवर डोळा ठेवून रिफायनरीला विरोध केला होता हे आठवावे असा टोला सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी नितेश राणेंना लगावला.तर, राजापूरच्या ग्रीन रिफायनरीला जनतेचा विरोध असल्यामुळे शिवसेनेने विरोध केला होता. आता ग्रीन रिफायनरीला काहींचे समर्थन आणि काहींचा विरोध अशी जनतेची भावना आहे. शिवसेना ग्रीन रिफायनरीबाबत जनतेसोबत होती आणि यापूढेही राहील असेही त्यांनी यावेळी सांगितले. कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेस तालुकाप्रमुख शैलेश भोगले, उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, नगरसेवक कन्हैया पारकर, संतोष परब, सचिन सावंत उपस्थित होते.यावेळी बोलताना सावंत म्हणाले, यापूर्वी देवगडमध्ये नितेश राणेंनी ग्रीन रिफायनरीमुळे जनतेला कॅन्सर होईल असे वक्तव्य केले होते. मग आता हा प्रकल्प करताना कॅन्सर कसा होणार नाही? हेही जनतेला सांगावे. नितेश राणेंच्या रिफायनरी प्रकल्पाविरोधातील या अगोदरची भाषणाची वृत्तपत्रातील कात्रणेच सावंत यांनी पत्रकार परिषदेत सादर केली. ते म्हणाले, रिफायनरीचे दलाल म्हणून प्रमोद जठार यांना हिणवणाऱ्या नितेश राणेंनी आता त्यांचेच नेतृत्व रिफायनरी साठी मान्य केले आहे.पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी देवगडमध्ये राज्य शासनाने दिलेल्या निधीच्याच कामांचे भूमिपूजन केले. दुसऱ्यावर टीका करणाऱ्या नितेश राणेंनी आपल्या सोयिस्कर बदलत्या भूमिकेबद्दल आधी बोलावे. केंद्रातून त्यांनी किती निधी आणला ते जनतेला सांगावे. सोयीनुसार आपली भूमिका बदलणाऱ्या राणेंना शिवसेनेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.देवगडमध्ये शिवसेनेचा आवाज वाढला असे म्हणणाऱ्या मंत्री आदित्य ठाकरेंना उद्देशून मांजरीचा की वाघाचा ? अशा खोचक सवालाने भाजपा आमदार नितेश राणेंनी ठाकरेंना डिवचले होते. यावर सतीश सावंत यांनी नितेश राणेंना उद्देशून सिंधुदुर्गात भालूचा अशुभ आवाज ऐकू येत असल्याचा पलटवार केला. भालू ओराडते तेव्हा काहीतरी अशुभ घडले असे म्हटले जाते. नितेश राणेंचा आवाज त्या भालू सारखा असल्याचा पलटवार सतीश सावंत यांनी यावेळी केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गnanar refinery projectनाणार प्रकल्पNitesh Raneनीतेश राणे