शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: नाना पाटेकरांचा बंगला कुठे आहे विचारत घरात घुसले, अज्ञात चोरट्यांनी वयोवृद्धाला लुटले

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: January 9, 2024 16:14 IST

दोघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले

आचरा : अभिनेते नाना पाटेकर यांचा बंगला कुठे आहे, अशी विचारणा करत एका वयोवृद्धाला अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून लुटले. सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास करत घराला बाहेरून कडी लावून पोबारा केला. घाबरलेल्या वयोवृद्धाने पोलिसांना कल्पना दिली. पोलिसही तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र रात्री उशिरापर्यंत चोरट्यांचा माग लागला नव्हता. ही घटना रविवारी रात्री आचरा वरचीवाडी येथील मारुती घाटी मार्गावर घडली. याप्रकरणी आचरा पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात जबरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आचरा मारुती घाटी येथील येथे घरात वयोवृद्ध मारुती वामन वाडेकर हे एकटेच राहतात. नेहमीप्रमाणे ते आपल्या घरात रविवारी सायंकाळी टीव्हीवर बातम्या बघत बसले होते. साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांचे बंद दार कोणीतरी ठोठावले. बाहेर कोण आले आहे हे बघण्यासाठी त्यांनी अर्धवट दार उघडून बघितले असता दोन व्यक्ती उभ्या होत्या. त्यांनी नाना पाटेकरचा बंगला कुठे आहे, अशी विचारणा केली. आम्हाला बाहेर येऊन पत्ता सांगा असे सांगू लागले. मात्र वाडेकर हे बाहेर येत नाहीत असे बघून त्या दोन चोरट्यांनी वाडेकर यांना जोरदार धक्का देत आत ढकलून घरात प्रवेश केला व त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठी हुसकावून घेतली.वाडेकर यांना धाक दाखवत घरातील पैसेही देण्यास भाग पाडले. घरात खोल्यांमध्ये शोधाशोध करत त्यांना ढकलून देत घराचे दर्शनी भागाचा दरवाजा बाहेरून बंद करत चोरटे पसार झाले. या घटनेनंतर वाडेकर यांनी आपल्या ओळखीच्या व्यक्तींना फोनवरून घडलेला प्रकार सांगून याची माहिती आचरा पोलिसांना दिली. वाडेकर यांची चोरट्यांनी १४ हजार रुपये किमतीची सुमारे दहा ग्रॅम वजनाची सोन्याची चेन, पाच हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, घरातील अंदाजित पाच हजार रुपये रोख रक्कम असे सुमारे २४ हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरी झाली आहे. याप्रकरणी आचरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल व्हटकर हे अधिक तपास करीत आहेत.

श्वान, ठसे तज्ज्ञ पथक दाखलदोन युवक हे रविवारी सायंकाळपासून मारुती घाटी परिसरात दुचाकीवरून संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे स्थानिकांनी पोलिसांना सांगितले. वाडेकर हे घरात एकटे असल्याचे त्यांची खात्री झाल्याने त्यांनी चोरीच्या उद्देशाने घरात घुसून दागिने, रोख रकमेवर डल्ला मारला. पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने वळवली असून, सोमवारी दुपारी दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. चोरीच्या पार्श्वभूमीवर आचरा येथे उपविभागीय पोलिस अधीक्षक तसेच श्वान व ठसे तज्ज्ञ पथक दाखल झाले होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस