विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2019 02:02 PM2019-08-14T14:02:28+5:302019-08-14T14:03:33+5:30

विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू होण्याची हृदयद्रावक दुर्घटना बुधवारी मणेरी टेमवाडी येथे घडली. गंभीर जखमी झालेला मयताचा पुतण्या अनिल नाईक यांच्यावर म्हापसा आजीलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही दुर्घटना सकाळी ९ व.च्या सुमारास घडली.

My - Leka's death due to electric shock | विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू

विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देविजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू मृताचा पुतण्या अनिल नाईक गंभीर जखमी

दोडामार्ग  : विजेचा शॉक लागून माय- लेकाचा मृत्यू होण्याची दुर्घटना बुधवारी मणेरी टेमवाडी येथे घडली.
अशी त्यांची नावे आहेत, तर गंभीर जखमी झालेला मृताचा पुतण्या अनिल नाईक यांच्यावर म्हापसा आजीलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत, ही दुर्घटना सकाळी ९ व.च्या सुमारास घडली.

या दुर्घटनेस वीज वितरणचा बेफिकीरपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. जोपर्यंत मयताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई दिली जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी गुरुदास नाईक यांचे मणेरी टेमवाडी येथे राहते घर आहे. बुधवारी सकाळी ते दूध घेऊन दूध डेअरीवर विकण्यास घेऊन गेले होते. तर त्यांची आई घरी एकटीच होती. याचदरम्यान घरापासून जवळच कुजलेला वास येत असल्याने त्या त्याठिकाणी पाहण्यास गेल्या असता त्यांचाच चार दिवसांपासून गायब असलेला कुत्रा कुजलेल्या अवस्थेत त्यांना आढळला. त्यामुळे त्या कुत्र्याला बाहेर ओढण्यासाठी त्या पुढे सरसावल्या असता त्याठिकाणी तुटून पडलेल्या विद्युतभारीत तारेला स्पर्श होऊन त्या जागीच ठार झाल्या.

काहीवेळाने दुध घेऊन गेलेला मुलगा गुरुदास हा त्याठिकाणी आला असता आपली आई जमिनीवर कोसळलेली त्यांना आढळली. त्यामुळे गोंधळलेल्या त्यांच्या मुलाने तिला उचलण्यासाठी हात लावला असता तो देखील विजेचा शॉक लागून जखमी झाला.

हा प्रकार गुरुदास यांचा चुलतभाऊ अनिल नाईक यांच्या लक्षात येताच त्यांनी सुक्या लाकडाने विजेची तार बाजूला करून दोघांनाही दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात आणले. दरम्यान गुरुदास याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आपल्या काकी व चुलत भावाला वाचविण्यासाठी प्रयत्न करणारे अनिल नाईक हे देखील जखमी झाले. त्यांना अधिक उपचारासाठी म्हापसा आजीलो रुग्णालयात नेण्यात आले.

या दुर्घटनेची माहिती मिळताच मणेरी ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या घटनेस वीज वितरणचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. जोपर्यंत या प्रकारास दोषीवर गुन्हा दाखल होत नाही व मयताच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यनतं मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आक्रमक पवित्रा संतप्त ग्रामस्थांनी घेतला होता.

Web Title: My - Leka's death due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.