शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

holi- शिमगोत्सवासाठी मुंबईकर दाखल, कणकवलीतील आठवडा बाजारात मोठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 13:41 IST

corona virus Kankvali Market Sindhudurg- कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्याचे दिसून येत होते.

ठळक मुद्देकणकवलीतील आठवडा बाजारात मोठी गर्दीबाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

कणकवली : कणकवली येथे मंगळवारी आठवडा बाजार भरतो. या दिवशी बाहेरगावांहून आलेल्या विक्रेत्यांमुळे बाजारपेठ फुलून जाते; तर जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांची आठवडा बाजारात गर्दी दिसून येत असते.कणकवली परिसरात शिमगोत्सवासाठी दाखल झालेल्या मुंबईकर मंडळींनी विविध साहित्य खरेदीसाठी आठवडा बाजारात आवर्जून उपस्थिती लावली. त्यामुळे गर्दीचे प्रमाण काहीसे वाढले होते. सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा अनेक ठिकाणी उडाल्याचे दिसून येत होते.मंगळवारी कणकवलीच्या आठवडा बाजाराच्या दिवशी कडाक्याच्या उन्हातही ग्राहकांनी खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती; तर आठवडा बाजारात विविध प्रकारच्या गावठी भाजीपाल्याची खरेदी करण्यात येत होती.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या नियमांचे पालन काटेकोरपणे होताना दिसत नव्हते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत आता कडक धोरण अवलंबण्याची गरज आहे. अन्यथा कोरोनाचा संसर्ग परत वाढण्याची शक्यता आहे.महागाईचा फटकाकोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या महागाईचा फटका सर्व घटकांना बसत असून सर्वच जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले आहेत.ओले काजू, कोकम रस, विविध प्रकारची सरबते, कैऱ्या, आदी साहित्याच्या खरेदीसाठी मंगळवारच्या आठवडा बाजारात नागरिकांनी गर्दी केल्याने बाजार फुलला होता. 

टॅग्स :HoliहोळीKankavliकणकवलीMarketबाजारsindhudurgसिंधुदुर्गcorona virusकोरोना वायरस बातम्या