शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई–विजयदुर्ग रो-रो सेवेची चाचणी यशस्वी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषी स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 16:04 IST

चाकरमान्यांसाठी ठरणार वरदान

देवगड : मुंबई - विजयदुर्ग रो-रो सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या चाकरमान्यांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरला. गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेली रो-रो सेवा बोट आज (मंगळवार) सायंकाळी सहा वाजता विजयदुर्ग बंदरात दाखल झाली. बोटीचे आगमन होताच ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या रोषणाईत आणि जल्लोषात तिचे भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी विजयदुर्ग ग्रामस्थांसह मुंबईतील चाकरमानी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ते या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी ही सेवा मुंबई-सिंधुदुर्ग प्रवासात क्रांती घडवून आणणार आहे.पहिली चाचणी यशस्वी : पालकमंत्री नितेश राणेसिंधुदुर्गचे पालकमंत्री आणि बंदर विकास मंत्री आमदार नितेश राणे यांनी सांगितले, “आज विजयदुर्ग बंदरात बोटीची पहिली यशस्वी चाचणी पूर्ण झाली आहे. हवामान अनुकूल राहिल्यास आणि सर्व यंत्रणांची पडताळणी समाधानकारक झाल्यास ही सेवा कायमस्वरूपी सुरू करण्यात येईल.” “परतीच्या प्रवासात या बोटीमार्गे चाकरमान्यांना थेट मुंबई गाठण्याचा मार्ग मोकळा होईल.”चाकरमान्यांसाठी ठरणार वरदानमुंबई-विजयदुर्ग दरम्यानची ही रो-रो सेवा सुरू झाल्यास प्रवाशांचा प्रवासाचा वेळ आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार आहे. स्थानिक विकास, पर्यटन आणि चाकरमान्यांच्या सोयीसाठी ही सेवा वरदान ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.