शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई येथील क्षयरुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:35 IST

सिंधुदुर्ग वासियांनो सावधान! मुंबई येथील क्षय रोग रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती आजच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे. मात्र या सर्वांना उपचाराखाली आणण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करा असे आदेशही सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी सभेत दिले.

ठळक मुद्देमुंबई येथील क्षयरुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली जनजागृती करण्याचे आरोग्य सभापतींचे आदेश

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वासियांनो सावधान! मुंबई येथील क्षय रोग रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती आजच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे. मात्र या सर्वांना उपचाराखाली आणण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करा असे आदेशही सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी सभेत दिले.जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सभा सभापती डॉ. अनीषा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, समिती सदस्य उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर, लक्ष्मण रावराणे, सुनिल मोरजकर, तालुका आरोग्य अधिकारी, अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.संसर्गजन्य रोगाबाबत आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८० क्षयरोग रुग्ण असल्याची माहिती सभेत देण्यात आली. मात्र ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे की वाढली आहे याबाबत सदस्यांनी उपस्थित अधिकारी यांना विचारले असता ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे सांगण्यात आले. मात्र या रुग्णाची संख्या वाढण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्नही सदस्यांनी केला असता हा आजार संसर्गजन्य आहे.

एका वक्तीपासून दुसऱ्याला होतो. तसेच यात जास्त करून मुंबई येथील क्षयरोग रुग्ण जिल्ह्यात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगतानाच एक सर्व रुग्ण उपचाराखाली असल्याचे सभेत सांगण्यात आले.पल्स आॅक्सी मीटरची मागणीयावेळी अनिशा दळवी यांनी, नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य संस्थेत दाखल झालेल्या गंभीर आजारी रुग्णांची पल्स व आॅक्सिजन समजण्यासाठी पल्स आॅक्सी मीटर व गरोदर मातेच्या गर्भातील बाळाचे ठोके समजण्यासाठी एनएफटी मशीन पुरविण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच साटेली प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका पुरविण्याची मागणी केली.महिला डॉक्टरने केली मुलींचीच तपासणीजिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या एका महिला डॉक्टरने एका अंगणवाडीत तपासणीसाठी गेली असता केवळ मुलींची तपासणी केली. मुलांची तपासणी केली नाही. याचा लेखी पुरावाच वेंगुर्ले सभापती सुनील मोरजकर यांनी सभेत सादर केला. यावेळी दळवी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत याची चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलsindhudurgसिंधुदुर्ग