शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

..यामुळे मुंबई मनपा निवडणूक अडकली - नितेश राणे 

By सुधीर राणे | Updated: October 9, 2023 17:36 IST

ग्रामसेवक बनायचीही पात्रता नसलेले संजय राऊत मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते

कणकवली: मुंबई महानगरपालिका निवडणूक ठाकरे सेनेमुळे लांबत आहे. त्यांनी न्यायालयातील आपल्या याचिका मागे घ्याव्यात. मग निवडणूक आयोग निवडणूक घेईल. ठाकरे सेनेच्या न्यायलयातील याचिकांमुळेच मुंबई महानगरपालिका निवडणुक अडकली आहे. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली. कणकवली येथे प्रसार माध्यमांशी त्यांनी सोमवारी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, ग्रामसेवक बनायचीही पात्रता नसलेले संजय राऊत २०१९ ला मुख्यमंत्री पदाचे स्वप्न बघत होते. शरद पवार आपलेच नाव पुढे चालवणार म्हणून ते आमदारांना फोन करायला लागले होते. पण २ ते ३ पेक्षा जास्त आमदार त्यांच्या बैठकीला जमलेच नाहीत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी राऊत यांची पात्रता ओळखली म्हणूनच त्यांचे भाऊ सुनील राऊत यांना साधे राज्यमंत्रीही केले नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलण्याआधी संजय राऊत यांनी स्वतःची पात्रता ओळखावी. 'ते' सांगण्याइतकं तुम्ही मोठे नाहीशिंदे गटातील शिवसेना आमदारानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना  किती त्रास होत आहे हे प्रथम पहावे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनी काय काम करावे? कुठे करावे ? हे सांगण्या इतके तुम्ही मोठे नाहीत.हे लक्षात घ्यावे. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री या तिघांना काम करू द्यावे. आपल्या बोलण्यामुळे राऊत, ठाकरे यांना फायदा होईल असे वागू नये. असे आवाहन मित्र पक्षाच्या आमदारांना राणे यांनी केले. ..त्यानंतर दुसऱ्यांवर टीका करा ठाकरे सेनेला स्वतःचे चिन्ह नाही, पक्ष नाही. मग ते काय करणार? त्यांना इंडिया आघाडी शिवाय दुसरा पर्याय नाही. बाळासाहेब ठाकरे तुमचे सुद्धा विठ्ठल होते ना, मग त्यांचे घर तुम्ही का फोडले? शरद पवार  तुमचे होते मग त्यांच्या घरात फूट का पाडली? याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे. त्यानंतरच दुसऱ्यांवर टीका करावी राणे म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे