शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण :  सात वयोवृध्द प्रकल्पग्रस्त करणार 10 जानेवारी पासून उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 6:07 PM

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी 10 जानेवारी पासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वयोवृध्द नागरिकानी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन कणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले आहे.

ठळक मुद्देसात वयोवृध्द नागरिकांचा समावेशकणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले निवेदनमहामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या !

कणकवली : मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरण प्रकल्पबाधितांवर अन्याय होत असून शासन तसेच प्रशासनाचे याकडे विविध माध्यमातून लक्ष वेधूनही त्याची योग्य दखल घेतली गेलेली नाही. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी 10 जानेवारी पासून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने वयोवृध्द नागरिकानी आमरण उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे लेखी निवेदन कणकवली प्रांताधिकाऱ्याना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, कणकवली बाजारपेठेतून महामार्ग क्रमांक 66 जात आहे. आम्ही त्याचे स्वागतही केले आहे. पण शासन आमची दिशाभूल आणि फसवणूक करून आम्हाला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न करीत आहे.प्रशासनाने चुकीच्या निकषांवर आमच्या मिळकतींचे मूल्यांकन करून आम्हाला पूर्णतः उ्ध्वस्त करून या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा डाव आखला आहे.हे आमच्या लक्षात आले तेव्हा खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आमदार वैभव नाईक, आमदार नीतेश राणे यांच्यासह अन्य नेत्यांनी याप्रकरणी लक्ष घालून आम्हाला न्याय मिळावा यासाठी वारंवार प्रयत्न केले.मात्र, शासनाने आता पर्यन्त आमच्या मागण्याना केराची टोपली दाखविली आहे. प्रशासनाने आमच्या मागण्यांची दखल घ्यावी म्हणून 7 डिसेंबर 2017 रोजी कणकवली शहर पूर्णतः बंद ठेवून प्रकल्पग्रस्तांच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पण गेंड्याच्या कातडिच्या शासनास त्याची दखल घ्यावीशी वाटलेली नाही.

त्यामुळे 10 जानेवारी 2018 पासून आमच्या मागण्या मान्य होईपर्यन्त आम्ही प्रकल्पग्रस्त आमरण उपोषणास बसणार आहोत. यानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस शासनच जबाबदार असेल. असेही या निवेदनात म्हटले आहे.दरम्यान, या निवेदनाची प्रत केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसुलमंत्री , पालकमंत्री, आमदार, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक तसेच अन्य अधिकाऱ्यांनाही दिली आहे.वयोवृद्ध प्रकल्पग्रस्त करणार उपोषण !कणकवली शहरातील मधुकर ठाणेकर( वय 89 वर्षे), आनंद अंधारी(वय 85 वर्षे), सत्यवान मांजरेकर( वय 80 वर्षे), सुभाष काकडे( वय 73 वर्षे), दत्तात्रय सापळे(वय 72 वर्षे), शामसुंदर बांदेकर(वय 80 वर्षे), गंगाधर ठाणेकर(वय 87 वर्षे) हे वयोवृध्द नागरिक प्रकल्पग्रस्तांच्यावतीने अन्याया विरोधात आमरण उपोषणास बसणार आहेत.महामार्ग चौपदरिकरण प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या !प्रकल्पग्रस्तांना देण्यात येणारा मिळकतीचा मोबदला कवडिमोल असून बांधकाम प्रति चौ.फू. रूपये 15000 व जमिनीचा दर प्रती गुंठा 15 लाख रूपये मिळावा. कणकवली शहर हे ग्रामीण भागाप्रमाणेच असल्यामुळे गुणांक 2 करावा. भाडेकरु व्यापाऱ्याना नुकसान भरपाई मिळावी. स्टॉल धारक व भाजी व्यापाऱ्याना जागेचा पर्याय उपलब्ध करावा.

बांधकाम मूल्यांकनाचे कागदपत्र त्वरीत मिळावेत. कणकवली शहराची फेरमोजणी व फेर मूल्यांकन व्हावे. सार्वजनिक बांधकाम विभागातील चुकीच्या पध्दतीने मूल्यांकन केलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. तसेच हे शक्य नसेल तर आम्हाला आमच्या कुटुंबियांसह गोळ्या घालून ठार मारून आमची शासकीय जाचातून सुटका करावी,अशा विविध मागण्या प्रशासन व शासन यांच्याकडे लेखी स्वरूपात प्रकल्प ग्रस्तांनी केल्या आहेत.

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्ग