शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, उड्डाणपुलाच्या कामाला गती-पावसाळ्यापूर्वी होणे आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 17:27 IST

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. ...

ठळक मुद्देचौपदरीकरणाबाबतच्या कणकवलीतील समस्या कायम

कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत कणकवलीत गांगोमंदिर ते शासकीय विश्रामगृहापर्यंत उड्डाणपूल होत आहे. या उड्डाणपुलाच्या कामाने गती घेतली आहे. मात्र, प्रकल्पबाधितांच्या समस्या अजूनही तशाच असून लोकप्रतिनिधीही गप्प आहेत. पावसाळ्यात अनेक समस्या निर्माण होणार असून त्यांचे निराकरण त्यापूर्वी होणे आवश्यक आहे.

कणकवलीत महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर भूसंपादन प्रक्रिया, रुंदीकरण, अतिक्रमण हटाव करीत असताना सुरुवातीला मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून विरोध झाला. प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासाठी लढा उभा राहिला. त्यानंतरच्या काळात सर्व्हिस रस्ते, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी यासाठीही आंदोलन झाले.

अधिकाऱ्यांवर चिखलफेकही झाली. त्यानंतर कणकवली शहरातील उड्डाणपुलाचे काम मोठ्या गतीने सुरू झाले. कोरोना विषाणूच्या संकटामुळे संचारबंदी लागू केल्याने परत हे काम बंद ठेवावे लागले होते. आता परत या कामाने वेग घेतला आहे. कणकवली शहरातील विकासाच्या या सेतूला खºया अर्थाने नवी झळाळी प्राप्त होताना दिसत आहे.

कणकवली शहरात वाहतूक कोंडीला या उड्डाणपुलामुळे कायमस्वरुपी तोडगा निघणार आहे. कणकवली नरडवे नाका ते एस. एम. हायस्कूलपर्यंतच्या पिलरचे काम पूर्ण झाले आहे. काही भागात वाय आकाराचे पिलर उभे केल्यानंतर उड्डाणपुलाच्या रस्त्याच्या स्लॅबच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. काही ठिकाणचे स्लॅब पूर्ण झाले आहेत. मे अखेरपर्यंत उड्डाणपुलाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेकेदाराने ठेवले होते.

परंतु लॉकडाऊनच्या काळातील जवळजवळ एक महिना काम बंद ठेवावे लागल्याने ते शक्य होणार नाही. तरीही आता वेगाने उड्डाणपुलाच्या स्लॅबचे काम कणकवली शहरात सुरू आहे.महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू असताना अरुंद सर्व्हिस रस्ते, बंद पथदीप, अधूनमधून रस्त्यावर पडणारे खड्डे अशा अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. तर अनेक प्रकल्पबाधितांना मोबदला न मिळाल्याने तेही अडचणीत सापडले आहेत. तर संबंधित जागेवरील काम रखडले आहे. त्यामुळे शहरातील सर्व्हिस रस्ते पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होऊ शकलेले नाहीत. परिणामी असलेल्या रस्त्यावर अनेकवेळा वाहतूक कोंडीचा अनुभव वाहनचालकांना तसेच पादचाऱ्यांना येत आहे. या समस्येतून आपली सुटका कधी होणार? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

कणकवली शहरात महामार्ग चौपदरीकरणाचे काम हाती घेतल्यानंतर शिवाजी चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटविण्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. अनेक राजकीय पक्षांनी आपली भूमिका मांडली होती. आता महामार्ग उड्डाणपुलाचे काम प्रगतीपथावर असतानादेखील त्या पुतळ्याचा प्रश्न ह्यजैसे थेह्ण स्थितीतच असल्याचे दिसून येत आहे.

पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करण्याचे आव्हान!

  • सिंधुदुर्गात जोरदार पाऊस पडत असतो. त्यामुळे पावसाळ्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणे मोठ्या जोखमीचे आहे. या चौपदरीकरणांतर्गत कणकवलीत उड्डाणपुलाचे काम सुरू असून पावसापूर्वी ते पूर्ण करण्याचे आव्हान ठेकेदार कंपनीसमोर आहे.
  • शहरातील महामार्गालगतच्या ओहोळांची साफसफाई करावी लागणार आहे. ती न केल्यास पावसाचे पाणी तुंबून अनेक इमारतींमध्ये ते घुसण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गkonkanकोकणhighwayमहामार्ग