शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
3
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
4
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
5
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
6
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
7
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
9
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
10
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
11
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
12
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
13
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
14
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
15
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
16
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
17
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
18
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
19
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
20
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!

ठरलं! मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीतच राहणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 9:35 PM

सावंतवाडी वेत्ये येथे एक सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कमोर्तब केले आहे.

सावंतवाडी : मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडीत जागा उपलब्ध न झाल्यास कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार विनायक राऊत यांनी दिले होते. मात्र शुक्रवारी सावंतवाडी वेत्ये येथे एक सहा एकर जागा वेत्ये ग्रामपंचायतची असल्याचे समोर येताच त्या जागेची स्वत: पालकमंत्री उदय सामंत यांनी खासदार राऊत यांच्यासह पाहणी केली आणि त्या जागेवर शिक्कमोर्तब केले आहे. त्यामुळे आता मल्टिस्पेशालिटी रुग्णालय सावंतवाडी तालुक्यातच राहणार हे निश्चित झाले आहे.यावेळी वेत्ये सरपंच स्रेह मिठबावकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना सहसंर्पक प्रमुख शैलेश परब, गितेश राऊत, रूची राऊत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, सुनील गावडे, गुणाजी गावडे, नरेश मिठबावकर, माजी सभापती रमेश गावकर, राजन पवार आदी उपस्थित होते. सावंतवाडी येथे मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारण्याचे ठरले होते. त्याचे भुमिपूजनही झाले होते. मात्र राजघराण्याशी असलेल्या वादामुळे हे रुग्णालय तसेच राहिले. मात्र आता पुन्हा या रुग्णालयाच्या जागेबाबत शोधाशोध झाली. पण सावंतवाडीमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे हे रुग्णालय कुडाळ नेरूर येथे हलविण्याचे संकेत खासदार राऊत यांनी दिले होते. मात्र वेत्ये येथे ग्रामपंचायतच्या मालकीची सहा एकरची जागा उपलब्ध असल्याचे लक्षात आल्यानंतर अधिका-यांसह पालकमंत्री व खासदार यांनी स्वत: जागेची पाहणी केली. यावेळी प्रांताधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना जागेचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही जागा मधोमध असून, सावंतवाडीपासूनही काही अंतरावर आहे. तसेच महामार्गा लगत ही जागा असल्याने अनेक दृष्टीने फायदा होणार आहे.वेत्ये येथील जागेवर पालकमंत्री सामंत यांनी शिक्कामोर्तब केले असून हीच जागा निश्चित करण्याच्या दृष्टीने आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी वेत्ये ग्रामपंचायतचेही आभार मानले. त्यांनी ही जागा आपल्या ताब्यात ठेवली. यावेळी खासदार राऊत यांनी माझ्या बोलण्याने वेग आल्याचे सांगत टीका करणा-यांवर अप्रत्यक्षरीत्या टीका केली.