शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

दीपक केसरकरांची पोपटपंची फार दिवस टिकणार नाही, विनायक राऊतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 12:31 IST

शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न

सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांची पोपटपंची आता जास्त दिवस टिकणार नाही. जनतेने सर्व काही ओळखले असून त्यांची वक्तव्ये गांभीर्याने घेणारी नसतात अशी जोरदार टीका खासदार विनायक राऊत यांनी केली. यावेळी शिंदे गटाकडून शिवसेना ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप ही त्यांनी केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.कोलगाव येथील टॉवर च्या उद्घाटनासाठी काल, सोमवारी राऊत आले होते. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा, बाळा गावडे, योगेश नाईक, अपर्णा कोठावळे, गुणाजी गावडे, मेघश्याम काजरेकर आदींसह शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.शिंदे गट शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर आपला अधिकार सांगत आहेत. मात्र मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर कोणीही कितीही दावा केला. तरी तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालीच होईल काहीनी कितीही आदळआपट करू देत आम्हाला काही देणे घेणे नाही. ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर वर भाष्य करत असतील तर त्याना काय बोलणार ते आता कुणाला मानायलाच तयार नाहीत असा आरोप ही राऊत यांनी शिंदे गटावर केला.संजय राऊत यांना ईडीने फसविलेशिंदे गट केवळ आमदार आणि खासदारांना फोडून गप्प बसला नाही. तर त्यांनी पूर्ण शिवसेना गुंडाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेनेच्या अनेक गोष्टीवर त्यांनी आपला दावा केला आहे. यात मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी सुद्धा त्यांनी परवानगी मागितली आहे. मात्र ठाकरे यांच्या माध्यमातून पहिली परवानगी आम्ही मागितली आहे. खासदार संजय राऊत यांना इडीने फसवले आहे. मात्र पूर्ण शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे राऊत म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरVinayak Rautविनायक राऊत