शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले, पण...; संजय राऊतांचे टीकास्त्र

By सुधीर राणे | Updated: February 18, 2023 14:23 IST

जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत

कणकवली: केंद्रातील भाजपा सरकार लोकशाहीच्या नावाने सुडाचे राजकारण करीत आहे. हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची? फैसला लोकांना करू द्या, असे आव्हान खासदार संजय राऊत यांनी दिले आहे. जरी श्रीरामाचे धनुष्यबान चिन्ह रावणाला मिळाले तरी रावण धनुष्य पेलवू शकत नाही. उलट तो धनुष्य त्यांच्या छाताड्यावर बसेल असेही त्यांनी ठणकावून सांगितले.उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत. जे शिंदेसोबत गेले ते पुन्हा निवडून येणार नाहीत. कोणत्याही सभागृहात ते पुन्हा दिसणार नाहीत असा विश्वासही संजय राऊतांनी व्यक्त केला. कणकवली येथील विजय भवन येथे आज, शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत,  संदेश पारकर, उपनेते गौरीशंकर खोत, युवासेना जिल्हाप्रमुख, नगरसेवक सुशांत नाईक, निलेश उर्फ आप्पा पराडकर, अतुल रावराणे, जिल्हाप्रमुख संजय पडते, राजू शेट्ये आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.राऊत म्हणाले, आता निवडणूक आयोगाला जाब विचारण्याची वेळ आली आहे. एक पक्ष गेली ५६ वर्षे घटनेप्रमाणे चालतो आणि पक्ष सोडून गेलेल्या लोकांना निवडणूक आयोग संपूर्ण पक्षाचे नाव आणि चिन्ह बहाल करतो याचा अर्थ राजकीय पक्ष म्हणजे काय? हे विचारण्याची वेळ आली आहे. तुम्हाला सत्तेची खुर्ची मिळाली म्हणजे तुमच्या हाती सर्व आले असे समजू नका, सत्ता येते आणि जाते. हे लक्षात घ्या. मोदी, शहाच्या कृपेने चोर, दरोडेखोरांना धनुष्यबाण चिन्ह शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे मोदी, शहाच्या कृपेने चोर, दरोडेखोराना निवडणूक आयोगाने दिले आहे.देशात घटना, कायदा आणि सर्वनियम पायदळी तुडवून हा निर्णय घेतला गेला. ही लोकशाहीची व्याख्या नाही. सगळे विषय खोक्यामध्ये होत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, आम्ही खचलो नाही, आम्ही शिवसैनिक खचणार नाही. उद्धव ठाकरे हेच आमचे सेनापती आहेत. पाळीव कुत्र्याने भाकरी पळवली, म्हणून कुत्रा मालक होऊ शकत नाही. कारण मालक तो मालकच असतो. भाजपच्या महाशक्ती विरुद्ध लढाईकालच्या निकालानंतर राज्यातील जनतेमध्ये भावनिक वातावरण आहे. चीड निर्माण झाली आहे. पश्चिम बंगाल मध्ये मोदी – शहा यांनी असेच वातावरण केले होते. त्यावेळी जनतेने भाजपला जागा दाखवलेली आहे असा टोला राऊत यांनी लगावला.  राज्यात भाजपने खेळ सुरु केला. मिंदे गट आणि शिवसेना अशी लढाई नाही. त्यामागे भाजपची महाशक्ती विरुद्ध आमची लढाई आहे. ज्या पद्धतीने सुडाचे राजकारण केले जात आहे. मुख्य पदावर कळसूत्री बाहुल्याप्रमाणे आपली माणसे ठेवून आपल्याला हवा तसा निर्णय करून घेतले जात आहेत. न्यायव्यवस्था आणि सर्वच पदांवर नियुक्ती केली जात आहे. हा निर्णय झाला तरी पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आम्ही वेगाने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली भरारी घेऊ. आमच्यावर कोणताही दबाव टाकला तरी झुगारून आम्ही उभारी घेऊ, शिवसेना भवन, शाखा आणि शिवसैनिक आमचे आहेत. फक्त भाजपने शिवसैनिकांमध्ये डोकी फोडून रक्त सांडण्यासाठी हि चाल खेळली आहे. त्यामुळे निवडणुका घ्या. कोण कोणासोबत आहेत ते समजेल? असेही राऊत म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाSanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा