आंदोलन करणारशिवसेनेचा इशारा :
By Admin | Updated: July 27, 2014 23:57 IST2014-07-27T23:50:40+5:302014-07-27T23:57:52+5:30
हत्तींचा धुडगूस ; नुकसानीची मागणी

आंदोलन करणारशिवसेनेचा इशारा :
सावंतवाडी : वनविभागाच्या दुर्लक्षामुळे रानटी हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीची तीव्रता वाढतच आहे. या नुकसानीचा फटका सामान्य ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांना बसत आहे. या विरोधात १५ आॅगस्ट रोजी मंत्रालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शिवसेनेचे सावंतवाडी उपतालुकाप्रमुख दीपक गावडे यांनी आंबोली परिसरातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर दिला.
आंबोली येथे हत्तींनी केलेल्या नुकसानीची दीपक गावडे व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. आंबोली परिसरात गेले काही दिवस हत्तींचे वास्तव्य असून दोन दिवसांपूर्वीच नांगरतास भागात भातशेती आणि बागायतीचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान केले होते. नुकसानग्रस्त भागाला शिवसेना तालुका उपप्रमुख दीपक गावडे यांच्यासह महेश गोवेकर, संजय गावडे, गजानन सावंत, रविराज सावंत, प्रवेश सावंत, आंबोली विभागप्रमुख उत्तम पारधी यांनी भेट दिली.
हत्तींकडून होणाऱ्या नुकसानीबाबत खासदार विनायक राऊत यांच्याशी चर्चा करुन शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी १५ आॅगस्ट रोजी मंत्रालयासमोर उपोषणाला बसणार आहे, असा इशाराही यावेळी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. यावेळी नुकसानग्रस्त संतोष आवटे, नाना आवटे, प्रदीप आवटे, चंद्रकांत गावडे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)