शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 20:47 IST

सदरच्या कारवाईमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर ठप्प होते.

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणा घर जावुनही त्याचा मोबदला दिलेल्या मुदतीत न दिल्यामुळे जिल्हा न्यायालयाच्या आदेशाने कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्ता जप्त करण्यात आली. यामध्ये सदरच्या कार्यालयातील प्रांताधिकारी यांच्या खुर्ची सहित इतर सर्व साहित्य कार्यालयाच्या बाहेर काढण्यात आले होते.

जिल्ह्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या कार्यालयातील सर्व साहित्य जप्त करण्याची ही पहिलीच घटना आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की पावशी येथील राजू मेहता व त्यांची पत्नी सुप्रिया मेहता यांचे घर त्यांची काही जमीन मुंबई महामार्ग चौपदरी करण्यात येत असल्यामुळे सदरच्या बंगल्याचे मूल्यांकन करून कुडाळ प्रांत अधिकारी कार्यालयाकडून मेहता यांना सुमारे 23 लाख 92 हजार 426 रुपये अदा करण्यात आले होते.

मात्र ही रक्कम इमारती पेक्षा कमी आहे. त्यामुळे मेहता यांनी याबाबत जिल्हाधिकारी लवादाकडे तक्रार अर्ज करून वाढीव रक्कम मिळावी अशी मागणी केली होती. सदरच्या मेहता यांच्या तक्रार अर्जाचा जिल्हा लवादाने विचार करत मेहता यांना वाढीव रक्कम देण्यात यावी असे कुडाळ प्रांत अधिकारी कार्यालयाला कळवले होते.

 न्यायालयाचा आदेश असतानाही मेहता यांना ही रक्कम प्रांत अधिकारी कार्यालयाकडून अदा केली नव्हती. त्यामुळे मेहता यांनी याबाबत सिंधुदुर्ग प्रधान जिल्हा न्यायालयाकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रार अर्ज नंतर जिल्हा न्यायालयाने सदरची रक्कम अदा न केल्यास अधिकारी कार्यालयातील सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्यात यावी असे आदेश दिनांक 2 जानेवारी रोजी काढले होते. असे आदेश निघूनही प्रांत अधिकारी कार्यालयाकडून सदरची रक्कम देण्याबाबत कोणतीच कार्यवाही न झाल्यामुळे सुप्रिया मेहता यांनी सदरच्या कार्यालयातील साहित्याची जप्ती करण्याची कार्यवाही सोमवारी सकाळी अकरा वाजल्यापासून कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांना घेऊन सुरू केली.

यावेळी प्रांताधिकारी यांची खुर्ची सहीत इतर खुर्च्या टेबल हे सर्व साहित्य कार्यालयाच्या बाहेर आणण्यात आले न्यायालयाने प्रांताधिकारी कार्यालयातील जंगम मालमत्तेमध्ये गोदरेज कपाटे 14 (सुमारे दोन लाख 80 हजार), ऑफिस टेबल 2 (सुमारे 75 हजार रूपये), खुर्च्या पाच (2 लाख रुपये), दोन सोपे (दीड लाख रुपये), कॉम्प्युटर टेबल 12 (1 लाख 50 हजार रुपये), एसी (3 लाख), फॅन सात (तीस हजार रुपये), प्रिंटर 12 (3 लाख रुपये), स्टील खुर्च्या 7 (70 हजार रुपये), लाकडी कपाटे सात ( 1 लाख रुपये), जनरेटर ( 3 लाख रुपये) तसेच इतर साहित्य मिळून सुमारे सोळा लाख 16 लाख 62 हजार 500 रुपयांची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले होते.

कारवाईच्या वेळी प्रांताधिकारी वंदना खरमाळे या कार्यालयात उपस्थित नव्हत्या. खरमाळे या पालकमंत्री उदय सामंत यांच्या दौऱ्यात होत्या. यावेळी कार्यालयात नायब तहसीलदार मुसळे तसेच इतर कर्मचारी अधिकारी उपस्थित होते. मात्र न्यायालयाच्या आदेशास असल्याने ते ही कारवाईच्या वेळी शांत होते.

सदरच्या कारवाईमुळे प्रांताधिकारी कार्यालयातील सर्व कामकाज दिवसभर ठप्प होते. खुर्च्या नसल्याने कर्मचारी उभे होते. त्यामुळे याचा फटका सर्व येथे येणाऱ्या नागरिकांना बसला.याबाबत नायब तहसीलदार मुसळे यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, मेहता यांच्या घरा संदर्भात आमच्याकडे जी रक्कम आली होती ती आम्ही यापूर्वी केली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ची मंजूर वाढीव रक्कम आहे ती रक्कम आम्ही कार्यकारी अभियंता महामार्ग प्रशासन यांच्याकडे मागणी केलेली आहे. मात्र ती रक्कम अद्याप आली नसल्यामुळे त्यांचे वाढीव पैसे आम्ही देऊ शकलो नाही. एका राजपत्रित अधिकाऱ्याच्या कार्यालयातील सर्व जंगम मालमत्ता जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असून या कारवाईमुळे सर्व प्रशासनात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गMaharashtraमहाराष्ट्र