शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत रंगणार मोती तलाव उत्सव, ३ मे रोजी उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2019 13:59 IST

सावंतवाडी नगरपरिषद व वेटलॅण्ड समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान घेण्यात येणार आल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. या उत्सवाचे उद्घाटन धवडकी येथील लोहार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडून होणार आहे.

ठळक मुद्देसावंतवाडीत रंगणार मोती तलाव उत्सव, ३ मे रोजी उद्घाटनविविध कार्यक्रम परिसंवादाचे आयोजन

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषद व वेटलॅण्ड समिती यांच्या संयुक्त विद्यमाने येथील मोती तलावाच्या काठावर पाचव्या मोती तलाव उत्सवांचे आयोजन करण्यात आले असून हा उत्सव ३ ते ६ मे दरम्यान घेण्यात येणार आल्याची माहिती नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिली. या उत्सवाचे उद्घाटन धवडकी येथील लोहार व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडून होणार आहे.पालिकेच्या लोकमान्य सभागृहात वेट लॅण्ड समिती व नगराध्यक्ष बबन साळगावकर यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. यावेळी नगरसेवक सुरेंद्र्र बांदेकर, आनंद नेवगी, वेट लॅण्डचे सचिन देसाई, तिलोत्तमा मांजरेकर, सायली करमळकर, शुभम पुराणिक आदी उपस्थित होते. यावेळी सचिन देसाई म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामोद्योग या व्यवसायावर आधारित उत्सव असणार आहे.

सावंतवाडीत मोती तलाव उत्सवाची बैठक पार पडली. यात नगराध्यक्ष बबन साळगावकर, आनंद नेवगी, सचिन देसाई, सुरेंद्र बांदेकर, सायल करमलकर सहभागी झाले होते.

सिंधुदुर्गात ग्रामोद्योगाला पोषक वातावरण आहे. मात्र, हे उद्योग आज लोप पावत चालले आहेत. त्यांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी उत्सवांच्या माध्यमातून प्रयत्न असणार आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बाहेरूनही वेगवेगळे कारागीर बोलावण्यात आले आहेत. यामध्ये कोलकाता येथून कपड्यांवर चित्र काढणारे चित्रकार, कर्नाटक येथील हातमाग कारागीर यांचा समावेश असणार आहे.देसाई पुढे म्हणाले, या फेस्टिव्हलचा उद्देश खरेदी-विक्रीचा नसून देवाण-घेवाणच्यादृष्टीने बघण्यात येणार आहे. या उत्सवांचे उद्घाटन ३ मे रोजी माडखोल- धवडकी येथील लोहार कुटुंबीयांकडून होणार आहे. शिवाय ३ मे रोजी मतिमंद मुलांचा आहार वेगवेगळ््या हंगामात कसा असावा, याबाबत डॉ. सुविनय दामले मार्गदर्शन करणार आहेत. ५ मे रोजी ह्यपाणी संवर्धन आणि पाऊसह्ण यावर डॉ. उमेश मुंडले मार्गदर्शन करणार आहेत.

टॅग्स :Sawantvadi Police Stationसावंतवाड़ी पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग