शिमगोत्सवानिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

By Admin | Updated: March 12, 2015 00:04 IST2015-03-11T23:11:52+5:302015-03-12T00:04:57+5:30

कोकण रेल्वे : उद्यापासून प्रवाशांसाठी महामंडळाचा निर्णय

More trains to Shimagotsav | शिमगोत्सवानिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

शिमगोत्सवानिमित्त रेल्वेच्या जादा गाड्या

रत्नागिरी : शिमगोत्सवानिमित्त मुंबईकरांची होणारी गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेने जादा गाड्यांची सोय केली आहे. या गाड्या १३ मार्चपासून कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.कोकण रेल्वेने याबाबत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, त्यानुसार १२ मार्चपासून या गाड्यांच्या आरक्षणाला प्रारंभ होईल. मध्य रेल्वेशी चर्चा केल्यानंतर कोकण रेल्वेने या जादा गाड्या प्रवाशांना उपलब्ध करुन दिल्या आहेत. १३ आणि २० मार्च रोजी रेल्वे नंबर ०१०३९ लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी ही सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी मध्यरात्री १.१० वाजता टिळक टर्मिनस येथून सुटेल व करमाळी येथे त्याच दिवशी रात्री ११ वाजता पोहोचेल.
रेल्वे नं. ०१०४० करमाळी ते लोकमान्य टिळक सुपर फास्ट विशेष रेल्वे गाडी करमाळी येथून १३ व २० मार्च रोजी दुपारी २ वाजता सुटेल व टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पोहोचेल. ही रेल्वे गाडी ठाणे, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि कुडाळ या स्थानकांवर थांबेल. या रेल्वेगाडीला १४ डबे असतील.तसेच दादर ते सावंतवाडी या दरम्यान विशेष आरक्षित रेल्वेगाडी सोडण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. या रेल्वेगाडीला १२ डबे असतील. १३, १५, १७ व २० मार्च रोजी ही आरक्षित रेल्वे नं. ०१०९५ दादर येथून सकाळी ७ वाजून ५५ मिनिटांनी सुटेल, ती सावंतवाडी येथे रात्री ८.३० वाजता पोहोचेल.रेल्वे नं. ०१०९६ सावंतवाडी - दादर ही गाडी १४, १६, १८ व २१ मार्च रोजी सावंतवाडी येथून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी सुटेल, ती दादर येथे त्याच दिवशी सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी पोहोचेल. ही रेल्वे गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि झाराप या स्थानकांवर थांबेल.या रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण रेल्व महामंडळातर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

जादा डब्यांची सोय
कोकण रेल्वेने रेल्वे नं. २२११३ लोकमान्य टिळक टर्मिनस ते कोचूवेली एक्स्प्रेस या रेल्वेगाडीला थ्री टायर वातानुकुलीत डबा जोडण्याचा निर्णय घेतला आहे. याची कार्यवाही १७ मार्चपासून होणार असून परतीच्या मार्गावर याच रेल्वेगाडीला हा डबा १९ मार्चपासून जोडण्यात येणार असल्याचे कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Web Title: More trains to Shimagotsav

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.