शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सिंधू रत्न योजनेतून सुमारे ५० कोटीहून अधिक निधी प्राप्त होणार; गेळे गावासाठी सहा कोटी मंजूर - मंत्री केसरकर

By अनंत खं.जाधव | Updated: October 8, 2024 15:19 IST

सावंतवाडी : सिंधू रत्न योजनेतून आतापर्यंत अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सुमारे ५० कोटीहून अधिक निधी या योजनेंतर्गत ...

सावंतवाडी : सिंधू रत्न योजनेतून आतापर्यंत अनेक योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. सुमारे ५० कोटीहून अधिक निधी या योजनेंतर्गत प्राप्त होणार आहे. गेळे गाव आंतरराष्ट्रीय पर्यटन गाव म्हणून विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी तिथे विविध उपक्रम राबविण्यासाठी सहा कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. तिलारी, तेरवण, मेढे येथे ॲम्युझमेंट पार्क साठीची निविदा प्रक्रिया निघणार आहे. त्यामुळे त्या भागात पर्यटन विकासाला गती प्राप्त होणार आहे, अनेकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. ..त्यामुळे मला निवडणूक प्रचारासाठी राज्यात डिमांडकुडाळ मतदारसंघातही धनुष्यबाणच चालणार आहे. माझा शांत स्वभाव आणि चांगले वक्तृत्व यामुळे मला निवडणूक प्रचारासाठी राज्यात डिमांड आहे. माझ्या मतदारसंघात महायुतीतील घटक पक्षांच्या मंडळींनी प्रचार केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात प्रचारासाठी आपण उतरेन, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्हयात काजू बोंडापासून रस बनविण्यासाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या काजू रस प्रक्रियेसाठी कृषी विद्यापीठाला अभ्यास व प्रक्रिया करण्यासाठी एक कोटी चाळीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढणारसिंधुरत्न योजनेतून गणेश मूर्तिकारांना कॉम्प्रेसरसाठी अनुदान मंजूर करण्यात आले आहेत. तसेच कोकणातील दशावतार कंपन्यांना वाहनांसाठी जवळपास दोन कोटी सत्तर लाख रुपये सबसिडीसाठी मंजूर होतील, असेही ते म्हणाले. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा मी सच्चा कार्यकर्ता आहे. त्यामुळे येणारी विधानसभा निवडणूक धनुष्यबाण चिन्हावरच लढणार, तसेच भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या उलटसुटल चर्चेला पुर्णविराम दिला.

जनता माझ्या पाठिशी माझी राज्यात चमकदार कामगिरी आहे. मतदारसंघात सुध्दा मी कोट्यवधीचा निधी आणला. मंत्री म्हणून काम करीत असताना कोणाच्या जमिनी खरेदी केल्या नाहीत. त्यामुळे येणाऱ्या काळात येथील जनता माझ्या पाठिशी ठामपणे उभी राहणार असल्याचा विश्वासही केसरकर यांनी यावेळी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDeepak Kesarkarदीपक केसरकर fundsनिधीtourismपर्यटन