शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2021 17:08 IST

या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली

सावंतवाडी : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे यामागणीसाठी मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी बंद असल्याने विद्यार्थी, प्रवासी,  सामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयावर आज, शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना आदी. मागण्याचे निवेदन देण्यात आले. सावंतवाडी एसटी डेपो बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.तर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना मोर्चा काढल्याप्रकरणी मंगेश तळवणेकर, अँड राजू कासकर, कारीवडे सरपंच  अपर्णा तळवणेकर, शिरशिंगे सरपंच रेखा घावरे व आनंद तळवणेकर यांना पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिक तसेच यावर अवलंबून असणाऱ्या विविध व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगार वाढ केली आहे. तरी त्यांनी अंतरिम शब्द म्हटला आहे. त्यामुळे त्यावर कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही. प्रचंड महागाई आणि तुटपुंजा पगारामुळे एसटी कर्मचारी आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा विचार करायला पाहिजे असे मंगेश तळवणेकर म्हणाले.तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन वेळा मोर्चाचे नियोजन केले. मागील वेळी जिल्ह्यात मनाई आदेश झाला आणि आताही मनाई आदेश करण्यात आला याला सर्वस्वी परिवहन मंत्री अँड अनिल परब जबाबदार आहेत, असे त्यांनी सांगून त्यांना जनता माफ करणार नाही असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष संजु परब यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संतोष भैरवकर, मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुक्यातील सरपंच, विद्यार्थी सामान्य नागरीक ,एसटी कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संपAnil Parabअनिल परब