शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर सिंधुदुर्गमध्ये मान्सून परतला, शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये आनंदी वातावरण 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: June 23, 2023 15:45 IST

मान्सून लांबणीवर पडल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत होती ​​​​​​​

सिंधुदुर्ग : मागील पंधरा दिवस दडी मारून बसलेला मान्सून शुक्रवारी (दि.२३) सिंधुदुर्ग किनारपट्टीवर दाखल झाला आहे. त्यामुळे आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.दरवर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात दमदार दाखल होणारा मान्सून यावर्षी बिपरजॉय वादळामुळे लांबणीवर पडला होता. मान्सून दाखल होणार म्हणून भात पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले होते. त्यातच नदी, नाले, ओढे पाण्याअभावी सुकून कोरडे पडले होते. ग्रामीण भागात पाण्याची तीव्र टंचाई भासत होती. सर्वच भागातील जलस्त्रोत आटल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत होती. हवामान विभागाने मागील काही दिवसांपासून मान्सूनचे आगमन लांबणीवर पडणार म्हणून इशारा दिल्यानंतर आता काय करायचे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. गेल्या काही वर्षांत पहिल्यांदाच जूनचा पहिला पंधरवडा कोरडा गेला. आता शेवटच्या आठवड्यात तरी पाऊस बरसू दे अशी मनोकामना व्यक्त होऊ लागली आहे. शुक्रवारी सकाळी दाखल झालेला मान्सून सक्रीय होणे आवश्यक आहे. हवामान विभागाने पुढील चार आठवड्यांमध्ये पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. या अंदाजानुसार अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गRainपाऊसFarmerशेतकरी