शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल शॉपी फोडणाऱ्यास पकडले,१९ मोबाईल केले हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2019 13:59 IST

वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील ह्यहॅलोह्ण मोबाईल शॉपी फोडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चंदन रामू चौहान ...

ठळक मुद्देमोबाईल शॉपी फोडणाऱ्यास पकडले,१९ मोबाईल केले हस्तगतस्थानिक पोलीस, गुन्हा अन्वेषणची कारवाई

वैभववाडी : वैभववाडी बाजारपेठेतील ह्यहॅलोह्ण मोबाईल शॉपी फोडून सुमारे १ लाख रुपये किमतीचे मोबाईल लंपास करणाऱ्या उत्तरप्रदेशच्या चंदन रामू चौहान (२७, रा. आझमगढ) याला स्थानिक गुन्हा अन्वेषणने मंगळवारी सायंकाळी कोकिसरे बेळेकरवाडी येथून ताब्यात घेतले.त्याच्याकडून २२ पैकी १९ मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्यामुळे यापूर्वी बाजारपेठेत झालेल्या चोरीच्या घटनांमध्ये त्याचा हात असण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. बाजारपेठेतील हॅलो मोबाईल शॉपी शुक्रवारी (ता. २९) रात्री फोडून शॉपीतील १ लाख रुपये किमतीचे २२ मोबाईल चोरट्याने लंपास केले होते. हा चोरीचा प्रकार शनिवारी सकाळी शॉपी मालक इम्तियाज काझी यांनी दुकान उघडल्यानंतर निदर्शनास आला होता.यासंदर्भात त्यांनी वैभववाडी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. बाजारपेठेत रहदारीच्या ठिकाणी ही चोरी झाल्यामुळे पोलीस चक्रावले होते. दरम्यान, मोठ्या प्रमाणावर मोबाईल चोरीस गेल्यामुळे स्थानिक पोलिसांसोबत स्थानिक गुन्हा अन्वेषण गुन्ह्यांचा तपास करीत होते. या पथकाच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागल्यानंतर सायंकाळी चोरट्यास पकडण्याच्या दृष्टीने वैभववाडीत सापळा रचला.

सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय बाकारे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा अन्वेषणचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुभाष खांदारे, पोलीस हवालदार संकेत खाडे, पोलीस कर्मचारी स्वप्नील तोरसकर, रवी इंगळे, रविकांत अडुळकर, राजू जामसंडेकर, योगेश राऊळ, मारुती सोनटक्के यांच्या पथकाने संशयित आरोपी चंदन चौहान याला कोकिसरे बेळेकरवाडी येथे राहत असलेल्या घरातून मुद्देमालासह ताब्यात घेत मोबाईल शॉपीमधून चोरलेले २२ पैकी १९ मोबाईल पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केले आहेत. तीन मोबाईल अद्याप सापडलेले नाहीत.पोलिसांनी पकडलेला चोरटा हा आझमगढ, उत्तरप्रदेश येथील असून गेली अनेक वर्षे तो वैभववाडी तालुक्यात प्लॅस्टर, फरशीची कामे करीत होता. बाजारपेठेत झालेल्या आणखी काही चोऱ्यांमध्ये त्याचा हात आहे का? याचा तपास आता पोलीस करणार आहेत. ही चोरी त्याने एकट्याने केली किंवा त्याचा आणखी कोणी साथीदार आहे? याचीही पोलीस कसून चौकशी करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग