शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 13:05 IST

मनसेतर्फे 9 ऑक्टोबरला सावंतवाड़ी पोलिस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार आहे.अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली .

ठळक मुद्देसावंतवाडीत 9 ऑक्टोबरला मनसेचा मोर्चा : परशुराम उपरकर अत्याचार प्रकरणी पोलिसांना विचारणार जाब

कणकवली :सावंतवाडीत घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीवर कडक कारवाई व्हावी. या आरोपींसह लॉज चालकावरही पेटांतर्गत गुन्हा दाखल व्हावा. सरकारतर्फे तज्ज्ञ वकिलांची नियुक्ती व्हावी. तसेच वेंगुर्लेतील मुलीचे लैंगिक शोषण करणार्‍या शिक्षकावर देखील कारवाई व्हावी या मागणीसाठी मनसेतर्फे 9 ऑक्टोबरला सावंतवाड़ी पोलिस उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढला जाणार आहे.अशी माहिती मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी येथे दिली .कणकवली येथील मनसे संपर्क कार्यालयात शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे आदी उपस्थित होते.यावेळी परशुराम उपरकर पुढे म्हणाले, या निषेध मोर्चामध्ये मनसे नेते शिरीष सावंत, महिला आघाडी उपाध्यक्षा स्नेहल जाधव, प्रवीण मर्गज, राजा चौगुले यांच्यासह मनसेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि नागरिक देखील सहभागी होणार आहेत.मनसेच्या मोर्चाच्या समारोपानंतर निवेदन स्वीकारण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी उपस्थित रहावे. यासाठी त्याना निमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्याशी घडलेल्या घटनेबाबत चर्चा करण्यात येणार आहे.

सावंतवाड़ी व वेंगुर्ले या दोन्ही घटनातील अल्पवयीन मुलींना शासनाच्या मनोधैर्य योजनेतून दहा लाख रूपये मिळावे. यासाठी पोलिसांनी शासनाजवळ प्रस्ताव पाठवावा अशी मागणी मनसेकडून करण्यात येणार आहे. हा मोर्चा मनसेचा असला तरी सर्व पक्षियानी त्यात सामिल व्हावे असे आवाहनही त्यानी यावेळी केले.ते पुढे म्हणाले, शिवसेना महिला आघाडीचे आम्ही अभिनंदन करतो. कारण त्यांनी पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसून सावंतवाड़ी अत्याचार प्रकरणातील आरोपीना शिक्षा व्हावी म्हणून मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे. तसेच पालकमंत्री निष्क्रिय असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आतातरी पालकमंत्र्यानी स्वपक्षियांचे म्हणणे मनावर घ्यावे आणि आपल्या कार्यपध्दतीत सुधारणा करावी .असेही उपरकर यावेळी म्हणाले.पालकमंत्री जनतेला सुरक्षितता देण्यात अपयशी!सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले दीपक केसरकर गृहराज्यमंत्रीही आहेत. मात्र, त्यांच्याच मतदार संघातील सावंतवाडीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार होतो. दुसरीकडे वेंगुर्ले येथे एका शिक्षकाकडून मुलीचे लैंगिक शोषण होते. हा प्रकार पालकमंत्र्यांच्या मतदारसंघात होतो. त्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पालकमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा . स्वतःचा मतदार संघ असुरक्षित असताना ते जिल्ह्यातील जनतेला सुरक्षतिततेचा विश्वास कसा काय देणार? असा प्रश्न उपस्थित करतानाच ते सर्वार्थाने अपयशी ठरले आहेत. अशी टिकाही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग