शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2022 17:51 IST

खासदार विनायक राऊत मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात

कणकवली : खासदार विनायक राऊत आपल्या शिवसेना सचिव पदाचा गैरवापर करत असतात. मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात. मात्र, ही पक्षश्रेष्ठींची फसवणूक आहे. विनायक राऊत यांच्या गटातटाच्या राजकारणामुळे शिवसेनेची वाताहत झाली आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे. कणकवली येथिल मनसे संपर्क कार्यालयात मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.उपरकर म्हणाले, नारायण राणेंच्या शिवसेना बंडानंतर झालेल्या हल्ल्यावेळीही राऊत स्वतःच्या घरात बसून होते. जखमी उमेश कोरगावकरना हॉस्पिटलमध्ये दाखल करायला आम्ही पुढे होतो. हल्ला करणारे संजय पडते आज शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत. शिवसेनेत झालेल्या बंडानंतर विनायक राऊत यांना कसलीच झळ बसली नाही. राऊत यांनी नेहमीच गटातटाचे राजकारण करुन स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली.राऊत त्यांनाही सेनेबाहेर घालवतीलमाजी पालकमंत्री उदय सामंत आणि खासदार राऊत यांच्या गटामुळे सेनेचेच नुकसान झाले आहे. आम्ही शिवसेनेसोबत म्हणणारे कितीजण सेनेत राहतील आणि कोण उदय सामंत यांच्यासोबत शिंदे गटात सामील होतील हे लवकरच समजेल. जे निष्ठावान सेनेत राहतील त्यांनाही गटातटाचे राजकारण करून खासदार राऊत सेनेबाहेर घालवतील अशी टीकाही परशुराम उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाMNSमनसेVinayak Rautविनायक राऊत Parshuram Upkarपरशुराम उपरकर