शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांनी सर्जेकोटमध्ये केला टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 17:22 IST

cyclone Water Sindhudurg : चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित असल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात कोळंब, सर्जेकोट गावातील भेटी दरम्यान आमदार वैभव नाईक यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पाण्याचा टँकर गावात उपलब्ध करून देत ग्रामस्थांची पाण्याची तहान भागविली.

ठळक मुद्देआमदारांनी सर्जेकोटमध्ये केला टँकरने पाणीपुरवठाकिनारपट्टीवरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या

मालवण : चक्रीवादळाच्या तडाख्यात ग्रामीण भागातील वीजपुरवठाही खंडित असल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. त्यात कोळंब, सर्जेकोट गावातील भेटी दरम्यान आमदार वैभव नाईक यांना ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने पाण्याचा टँकर गावात उपलब्ध करून देत ग्रामस्थांची पाण्याची तहान भागविली.किनारपट्टी भागातील सर्जेकोट गावास उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागते. यातच तौक्ते चक्रीवादळामुळे वीज खांब कोसळून वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी नळपाणी योजनेचा पाणीपुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांचे हाल झाले होते. ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याची वेळ आली. काही ग्रामस्थांना पाणी विकत घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.काही वाडीत अरूंद रस्त्यामुळे पाणी उपलब्ध करून देणे अडचणीचे भासत असल्याने त्या वाडीतील ग्रामस्थांना बॅरलमधून पाणी उपलब्ध करून देण्यात आले. शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिल्याने स्थानिक ग्रामस्थांनी आमदारांचे आभार मानले.तीस कुटुंबांना पाणी उपलब्धआमदार वैभव नाईक यांनी कोळंब, सर्जेकोट गावात झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या ग्रामपंचायत सदस्या भारती आडकर यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानुसार नाईक यांनी सर्जेकोट गावात टँकर उपलब्ध करून देत सीमादेवी, पारवाडीतील सुमारे तीस कुटुंबांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले.

टॅग्स :water shortageपाणीकपातMalvan beachमालवण समुद्र किनाराsindhudurgसिंधुदुर्गcycloneचक्रीवादळ