शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

Sindhudurg District Bank Election: आमदार नितेश राणेंना मतदानाचा हक्क नाकारला, सहकार विभागाचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2021 15:46 IST

या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

सिंधुदुर्ग : जिल्हा बँक अध्यक्ष सतिश सावंत याचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले असतानाच त्यांना आता दुसरा झटका बसला आहे. आमदार राणे यांना सहकार विभागाने बँक निवडणुकीत मतदानाचा अधिकार नाकारला आहे. यावर आता राणे काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे. कारण या निवडणुकीत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासह आमदार नितेश राणे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आज, गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून सिंधुदुर्गातील राजकीय वातावरण तापले आहे. राणे कुटुंबिय आणि शिवसेनेमध्ये जोरदार धुमशान सुरु आहे. या रणधुमाळीत महाविकास आघाडीचे प्रचारप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे अडचणीत आले. त्यांना या प्रकरणी कधीही अटक होवू शकते. यामुळे आमदार राणे यांनी अटकपूर्व जामीनासाठी न्यायलयात अर्ज दाखल केला आहे. मात्र, त्यापूर्वी नितेश राणे यांना दुसरा झटका बसला.आमदार राणे यांना सहकार विभागाने मतदानाचा अधिकार नाकारला आहे. सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळाने जिल्हा बँकेकडून कर्जरुपी घेतलेले 16 कोटी रुपये थकीत आहेत. यामुळे आमदार राणेंना मतदानाचा अधिकार नाकारला आहे. सहकार विभागाच्या या निर्णयामुळे राणेंना आणि भाजपाला मोठा धक्का बसला आहे.दरम्यान आज सकाळीच मतदाना दरम्यान कणकवली तहसील केंद्रावर महाविकास आघाडीचे पॅनल प्रमुख सतीश सावंत आणि भाजपाच्या महिला उमेदवार प्रज्ञा ढवण आणि जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दुपारपर्यंत तालुक्यात ६५ टक्के मतदान झाले.याच दरम्यान संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी संशयित म्हणून पोलिसांच्या रडारवर असलेल्या वेंगुर्ले येथील मनीष दळवी यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायाधीश यांनी नाकारला आहे. दळवी हे जिल्हा बँकेसाठी भाजपचे उमेदवार आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गbankबँकElectionनिवडणूकNitesh Raneनीतेश राणे Votingमतदान