शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणायचं अन्..; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

By सुधीर राणे | Updated: January 24, 2024 12:54 IST

सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट बोलण्यास 'त्यांना' लाज वाटायची

कणकवली: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखा  कडवट आणि प्रखर हिंदुत्ववादी नेता आजपर्यंत देशामध्ये झाला नाही. त्यांच्या विचारांना व  प्रत्येक इच्छेला खऱ्या अर्थाने न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. अयोध्येमध्ये भव्य राम मंदिर उभे राहिले असून प्रभू श्री रामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. जर आज बाळासाहेब असते तर ते पाहिल्यानंतर त्यांनी ' शाब्बास मोदीजी' अशी शाबासकी दिली असती. मात्र, त्यांचे  हिंदुत्ववादी विचार दुर्दैवाने त्यांच्या मुलाला पुढे घेऊन जाता आले नाहीत. अशी टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.कणकवली येथे मंगळवारी त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, स्वतः बाळासाहेबांच्या विचाराचा वारसदार म्हणण्याचा ढोंगी  पणा करायचा आणि ज्या काँग्रेसला बाळासाहेबांनी शेवटच्या क्षणापर्यंत विरोध केला त्यांना साथ करायची असे उद्धव ठाकरे यांचे धोरण आहे. 'माझ्या शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही', असे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगत असायचे. मात्र, उद्धव ठाकरे यांना ते जमले नाही. बाळासाहेब रुद्राक्ष माळ घालायचे ती नेमकी आता कुठे आहे. याचे उत्तर देण्याच धाडस उद्धव ठाकरे आणि कुटुंबिय करणार आहेत का ?  त्यांची सत्ता असताना बाळासाहेबांना हिंदूह्रदयसम्राट बोलण्यास उद्धव ठाकरे यांना लाज वाटायची.  तसेच त्यांचे फलकावर फोटो लावण्याचे बंद करून टाकले होते. मात्र, आज शिवसेना पक्ष रसातळाला गेला, तेव्हा बाळासाहेबांची आठवण त्यांना झाली. तसेच  बाळासाहेबांसारखे दिसण्याचा प्रयत्न हे बहुरूपी करत आहेत. त्यामुळे बाळासाहेबांच्या मूळ शिवसैनिकांचा त्यांच्यावर  विश्वास आहे का? असा प्रश्नही आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे