शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

आमदार दीपक केसरकरांना धमकीचा फोन, केसरकरांनी स्वत: दिली माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2021 17:27 IST

वाघापुढे मांजर म्याव म्याव करणारच. पण म्याव म्याव करणाऱ्यांनी जेलमधील वडापाव खाल्ला हे विसरू नये असाही टोलाही केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.

सावंतवाडी : चार दिवसापूर्वी पत्रकार परिषद झाल्यानंतर मला एका समर्थका कडून धमकीचा फोन आला होता. तो नंबर माझ्याकडे असून अद्याप पर्यंत पोलिसांत याची तक्रार दिली नाही, पण फोन वरून आणखी काय जर बोलला असता तर पोलिसांकडे तक्रार केली असती असा इशारा आमदार दीपक केसरकर यांनी दिला.जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा धमकीचा फोन आल्याचे आमदार दीपक केसरकर यांनी सांगितले. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.आमदार केसरकर म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा दहशतीने डोके वर काढले आहे. जिल्हा बँक निवडणूक ही शेतकऱ्याची बँक असून ती कोणाच्या तरी हातात देऊन आपणास काय साध्य करायचे आहे असा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. आपणास हा दहशतवाद संपवायचा आहे. मी चार दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेतली होती ही यानंतर मला धमकीचा फोन आला होता असेही त्यांनी सांगितले.म्याव म्याव वाल्यांनी जेलमधील वडापाव आठवावा विधानसभा परिसराचे सर्व सदस्यांनी पावित्र्य जपले पाहिजे. वाघापुढे मांजर म्याव म्याव करणारच. पण म्याव म्याव करणाऱ्यांनी जेलमधील वडापाव खाल्ला हे विसरू नये असाही टोलाही केसरकर यांनी आमदार नितेश राणे यांचे नाव न घेता लगावला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDipak Kesarkarदीपक केसरकरCrime Newsगुन्हेगारी