मुंबईची बेपत्ता युवती चाफेखोलमध्ये ताब्यात
By Admin | Updated: May 10, 2014 23:57 IST2014-05-10T23:57:53+5:302014-05-10T23:57:53+5:30
मालवण : मुंबईतून गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीला मालवण तालुक्यातील चाफेखोल येथून तिच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

मुंबईची बेपत्ता युवती चाफेखोलमध्ये ताब्यात
मालवण : मुंबईतून गुरुवारपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीन युवतीला मालवण तालुक्यातील चाफेखोल येथून तिच्या मित्राच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. तिच्या पालकांना बोलावून शनिवारी तिला ताब्यात देण्यात आले. आपण स्वखुशीने मित्राबरोबर आल्याचे तिने स्पष्ट केले. मोबाईल लोकेशन आणि मुंबईतून तिचा मित्रही गायब झाल्याने पोलिसांनी शोध घेण्यात यश मिळविले होते. मालवण पोलिसांना मुंबईतून एक अल्पवयीन युवती सिंधुदुर्गात पळून आल्याची माहिती मिळाली होती. तिच्या शोधार्थ पोलिसांनी माहिती घेण्यास सुरुवात केली होती. मोबाईल लोकेशनवरुन ती युवती मालवण तालुक्यात असल्याचे स्पष्ट झाले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मालवण पोलीस ठाण्याच्यावतीने कट्टा पोलीस दूरक्षेत्राच्या कर्मचार्यांना चाफेखोल परिसरात शोध घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सदर युवती मित्राच्या घरीच सापडून आली. तिने आपण स्वखुशीने आल्याचे स्पष्ट केले. यामुळे पोलिसांनी तशाप्रकारे जबाब लिहून घेतला आणि युवतीच्या पालकांशी संपर्क साधला. शनिवारी युवतीचा भाऊ कट्टा येथे आल्यानंतर त्याच्या ताब्यात बहिणीला देण्यात आले. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी युवकावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती. (प्रतिनिधी)