सिंधुदुर्ग : मुंबई येथे होणाऱ्या ‘इंडिया मेरिटाइम वीक’ या आंतरराष्ट्रीय परिषदेच्या अनुषंगाने राज्याचे बंदरे, मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे सद्या स्वीडन दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी तेथील नामांकित समुद्री तंत्रज्ञान आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यांसोबत गुंतवणूक, तंत्रज्ञान हस्तांतरण आणि रोजगारनिर्मिती याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.या भेटीत मंत्री राणे यांनी इचान्डीया-Echandia (समुद्री बॅटरी निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी) आणि इनराईड - Einride (आधुनिक पुरवठा साखळी व स्वयंचलित वाहतूक तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रगण्य संस्था) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प आणि संशोधन सुविधा उभारण्याच्या दृष्टीने या कंपन्यांसोबत सकारात्मक चर्चा झाली.मंत्री राणे यांनी या कंपन्यांना महाराष्ट्रात उत्पादन युनिट्स आणि तंत्रज्ञान केंद्रे स्थापन करण्याचे आमंत्रण दिले असून, राज्य सरकारच्या ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘ग्रीन इंडस्ट्रीज’ धोरणांतर्गत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शवली आहे. यामुळे महाराष्ट्रात नवीन रोजगारनिर्मिती, हरित तंत्रज्ञानातील गुंतवणूक, तसेच आंतरराष्ट्रीय समुद्री सहकार्य यांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. स्वीडनमधील मेरीटाईम क्षेत्रात महाराष्ट्राबाबत प्रचंड उत्सुकता असून, या दौऱ्यामुळे राज्य आणि युरोपीय समुद्री उद्योगांमध्ये नवे सहकार्याचे पूल निर्माण होतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. यावेळी अंबर अयाडे, ग्रामीण एन्हान्सर्स समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि एफडीआय (ईसीए) चे सदस्य उपस्थित होते.
Web Summary : Minister Rane's Sweden visit focused on maritime technology, green energy investment, and job creation. Discussions with Echandia and Einride explored establishing manufacturing and research facilities in Maharashtra. Rane invited companies to invest under 'Make in Maharashtra,' anticipating new jobs and international maritime cooperation.
Web Summary : मंत्री राणे की स्वीडन यात्रा समुद्री प्रौद्योगिकी, हरित ऊर्जा निवेश और नौकरी सृजन पर केंद्रित थी। एचांडिया और इनराइड के साथ महाराष्ट्र में विनिर्माण और अनुसंधान सुविधाएं स्थापित करने पर चर्चा हुई। राणे ने 'मेक इन महाराष्ट्र' के तहत निवेश के लिए कंपनियों को आमंत्रित किया, जिससे नई नौकरियां और अंतर्राष्ट्रीय समुद्री सहयोग की उम्मीद है।