शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

उद्धव ठाकरेंचे स्वागत, पण अडीच वर्षांत कोकणला काय दिले; मंत्री दीपक केसरकरांचा सवाल 

By अनंत खं.जाधव | Updated: February 1, 2024 18:12 IST

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आज, गुरूवार पासून सुरू झाला असून ते रविवारी ...

सावंतवाडी : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा आज, गुरूवार पासून सुरू झाला असून ते रविवारी 4 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरेंच्या दौऱ्याचे स्वागत करतानाच विकास कामावरून चिमटा काढला आहे. तुम्ही अडीच वर्षांत काही दिले नाही पण एकनाथ शिंदे यांनी कोकणात अनेक विकासाचे प्रकल्प दिले. लोकांना विकास हवा आहे. मनोरंजन नको असा टोलाही लगावला.मंत्री केसरकर हे सिंधूरत्नच्या बैठकीसाठी मळगाव येथे आले होते. त्यावेळी त्यांनी जिल्ह्यातील अधिकारी वर्गाची सिंधुरत्नची आढावा बैठक घेतली. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, अमित कामत, राजन पोकळे, सचिन वालावलकर, क्षितिज परब आदी उपस्थित होते.मंत्री केसरकर म्हणाले, ज्या मराठा बांधवाकडे कुणबी दाखले आहेत त्यांनाच कुणबी दाखले देण्याचा निर्णय जुनाच आहे. त्यावरून कुणाची नाराजी उद्भवण्याची गरज नाही. मंत्री छगन भुजबळ हे सरकारमधील ज्येष्ठ मंत्री आहेत ते नाराज नसून समता परिषदचे काम करत असल्याने ते कदाचित सरकारच्या निर्णयावर भाष्य करीत असावेत असे मत व्यक्त केले. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत सर्व विषयावर चर्चा होत असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले. मंत्री भुजबळ यांच्या बाबतीत आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी स्पष्ट बोलण्याचे टाळले. मात्र मुख्यमंत्री त्यांना समज देतील  भुजबळ ज्येष्ठ मंत्री असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.लोकांना विकास हवा, मनोरंजन नको उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर त्यांनी टिका करताना अडीच वर्षांत कोकणला काही दिले नाही. बोलून लोकांचे मनोरंजन होणार नाही हाताला काही तरी काम दिले पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सावंतवाडी मतदारसंघात कोटयवधीचा निधी दिला. त्याची भूमिपूजन लवकरच होणार आहेत. मात्र आम्ही ठाकरेचे स्वागत करतो कारण ते ज्येष्ठ व्यक्तीमत्व आहे. मात्र त्यांनी आपण मुख्यमंत्री म्हणून कोकणला काय दिले ते बघावे तसेच पर्यटन मंत्री यांच्यामुळे अनेक प्रकल्प रद्द झाले अशी टिका ही मंत्री केसरकर यांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUddhav Thackerayउद्धव ठाकरेDeepak Kesarkarदीपक केसरकर