शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नेमळेत बागेस आग लागून लाखोंचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 14:49 IST

Mango Fire Sindhudurg : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे-देऊळवाडी येथील मनोहर शांताराम परब यांच्या आंबा कलमाच्या बागेस मंगळवारी अचानक आग लागल्याने लाखोंची हानी झाली आहे. आंबा कलमांसोबतच या आगीत वीस काजू कलमे, बांबूची चार बेटेही होरपळून गेली. त्याचबरोबर २० हजार किमतीची गवताची गंजी, १५ हजार किमतीचे भातमळणी यंत्र जळून खाक झाले. त्यामुळे परब यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देनेमळेत बागेस आग लागून लाखोंचे नुकसान काजू कलमे, बांबूची बेटे होरपळली : भातमळणी यंत्र खाक

तळवडे/सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील नेमळे-देऊळवाडी येथील मनोहर शांताराम परब यांच्या आंबा कलमाच्या बागेस मंगळवारी अचानक आग लागल्याने लाखोंची हानी झाली आहे. आंबा कलमांसोबतच या आगीत वीस काजू कलमे, बांबूची चार बेटेही होरपळून गेली. त्याचबरोबर २० हजार किमतीची गवताची गंजी, १५ हजार किमतीचे भातमळणी यंत्र जळून खाक झाले. त्यामुळे परब यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.आंबा हंगामाच्या काळात लागलेल्या या आगीत परब यांची आंबे लागलेली १५ आंबा कलमे भस्मसात झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. आग लागल्याची माहिती मिळताच नेमळेचे तलाठी अरुण पाटोळे, लिपिक सुनील राऊळ, बाबू परब यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तसेच कृषी विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाला कळवून पंचयादी तयार करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, उशिरापर्यंत कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले नव्हते.

परब यांच्या या बागायतीलगत रेल्वेचा ट्रॅक असल्यामुळे रेल्वेतील प्रवाशांकडून टाकलेल्या विडी किंवा सिगारेटमुळेही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान, या आगीत झालेल्या नुकसानीची लवकरात भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी मनोहर परब यांनी केली आहे. 

टॅग्स :fireआगMangoआंबाsindhudurgसिंधुदुर्ग