शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न ; फसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2021 15:30 IST

Kankavli Market Sindhudurg- कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .

ठळक मुद्देफसवणूक प्रकरणी नगराध्यक्षानी गुन्हा दाखल करावा कन्हैया पारकर यांची मागणी ; भाजी मार्केट आरक्षण विकास प्रश्न

कणकवली : कणकवली शहरात भाजी मार्केटच्या उभारणीमध्ये भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली भागधारक असलेल्या ग्लोबल असोसिएटने शहरवासीयांची फसवणूक केली आहे . त्यांच्याच पक्षाचे असलेले कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी त्याबाबतचा आरोप सभागृहात केला आहे . त्यामुळे या फसवणूक प्रकरणी त्यांनी संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करावा. तसेच तेलींनी आपल्या भाजपा जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी केली आहे .येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत नगरपंचायत विरोधी पक्षगटनेते सुशांत नाईक , नगरसेवक रूपेश नार्वेकर उपस्थित होते .यावेळी कन्हैया पारकर म्हणाले , भाजी मार्केट साठी आरक्षित असलेल्या ३२ गुंठे जागे पैकी १२ गुंठे जागा आणि १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम ग्लोबल असोसिएट नगरपंचायतीला करारानुसार देणार आहेत . मात्र भाजी मार्केटचे बांधकाम करताना तळमजल्यावर पार्किंग आणि उर्वरित तीन मजल्यावर गाळे आणि भाजी विक्रीचे कट्टे बांधण्यात आले आहेत . एका मजल्यावर फक्त ४२ विक्रेत्यांची सोय होणार आहे . शहरात ३०० हून अधिक भाजी , फळ , फुल विक्रेते आहेत . त्यामुळे भाजी मार्केट बांधूनही शहरातील भाजी विक्रेत्यांचे तेथे स्थलांतर होणार नाही .नगरपंचायतीला १२ गुंठे जागा देण्याच्या मोबदल्यात विकासकाने संपूर्ण ३२ गुंठे जागेचा एफएसआय घेतला आहे . या विकासकाच्या इमारती दर्शनी भागात आणि रस्त्यालगत आहेत . तर भाजी मार्केट अडगळीच्या ठिकाणी बांधण्यात आले आहे . तेथे जाण्यासाठी प्रशस्त रस्ता देखील नाही . तसेच ग्राहक पहिल्या मजल्यापर्यंतच भाजी व इतर वस्तू खरेदीसाठी जाऊ शकतात . दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर भाजी मार्केट उभारल्याचे उदाहरण आपल्या देशात तरी नाही . त्यामुळे १७ हजार चौरस फुटाचे बांधकाम बांधून देत असल्याचा तेली यांचा दावा खोटा आहे .

नगरपंचायत सभेत खुद्द नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीच विकासकांनी शहरवासीयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे . नगराध्यक्ष हे भाजपचे आहेत . तर त्याच पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत . त्यामुळे त्यांनी तत्काळ आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला हवा . तसेच नगराध्यक्षांनीही विकासकावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाला भाग पाडायला हवे . नगराध्यक्षांनी तसे न केल्यास आम्ही विरोधक प्रशासनाकडे फौजदारी गुन्हा दाखल करण्याबाबतची मागणी करणार असल्याचेही पारकर यावेळी म्हणाले .नगराध्यक्षाना शिवसेनेचे दरवाजे खुलेकणकवली भाजी मार्केट प्रश्नी कणकवली नगराध्यक्षांनी सर्वसामान्यांच्या हिताची भूमिका घेतली आहे . त्यांनी त्या भूमिकेवर ठाम राहावे . भाजी मार्केटमध्ये शहरवासीयांची फसवणूक होत आहे . खुद्द नगराध्यक्षांनीच आम्हा सर्व नगरसेवकांच्यावतीने त्याबाबतची भूमिका सभागृहात मांडली आहे .

भाजप पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजन तेली आहेत . तर नगराध्यक्ष समीर नलावडे हे देखील त्याच पक्षात आहेत . त्यामुळे त्यांच्यावर पक्षीय दबाव तसेच दडपण येण्याची शक्यता आहे . त्यांना पक्षाचे दरवाजे देखील बंद होऊ शकतात . तशी परिस्थिती निर्माण झाली तर नगराध्यक्षांना शिवसेनेचे दरवाजे खुले आहेत . त्यांना आमच्याकडे येण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही . त्यामुळे भाजी मार्केट प्रश्नी त्यांनी आपली भूमिका कायम ठेवावी. असे यावेळी सुशांत नाईक म्हणाले.

टॅग्स :MarketबाजारKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग