शहरं
Join us  
Trending Stories
1
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
2
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
3
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
4
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
5
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
6
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
7
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
8
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
9
शरद पवार यांच्या ताफ्यातील दोन वाहने धडकली
10
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...
11
पाकिस्तान भारताची कॉपी करायला गेला, चीनच्या मदतीनं लॉन्च केलं 'मून मिशन'; झाला 'खेला'!
12
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
13
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
14
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
15
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
16
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
17
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
18
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
19
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
20
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...

सीएएच्या समर्थनार्थ कुडाळात विशाल लक्षवेधक तिरंगा रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:20 PM

केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता.

ठळक मुद्देमहिलांसह नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देशप्रेमी मंचाचे तहसीलदारांना निवेदन

कुडाळ : केंद्र शासनाने लागू केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा व राष्ट्रीय नागरिकता नोंदणीच्या समर्थनार्थ कुडाळ शहरामध्ये भव्य रॅली काढण्यात आली. तिला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमधील विशाल तिरंगा लक्ष वेधून घेत होता.या रॅलीमध्ये भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक, नगराध्यक्ष ओंकार तेली, रणजित देसाई, भाजपाचे तालुकाध्यक्ष गोपाळ हरमलकर, मिलिंद देसाई, विवेक पंडित, बंड्या सावंत, अभय शिरसाट, धीरज परब, संध्या तेरसे, अ‍ॅड. विवेक मांडकुलकर यांच्यासह हजारो नागरिक सहभागी झाले होते.कुडाळ शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याकडून रॅलीला प्रारंभ होऊन गांधी चौक, जिजामाता चौक अशी तहसील कार्यालयात ती पोहोचली. विशेषत: महिलांच्या हातात नागरिकत्व कायद्याचे समर्थन करणारे फलक होते. भारतमातेची प्रतिकृती, भगवा व तिरंगा झेंडा लक्षवेधी ठरला. शांततेत निघालेल्या रॅलीत ह्यवंदे मातरम्, भारत माता की जयह्ण अशा घोषणांनी परिसर दुमदुमून टाकला.यावेळी देशप्रेमी नागरिक मंचाच्यावतीने तहसीलदार रवींद्र नाचणकर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने भारतीय घटनेच्या अधीन राहून मंजूर केलेल्या नागरिकता सुधारणा कायद्यास आम्हा देशप्रेमी नागरिकांचा मनापासून पाठिंबा असून सरकारने या कायद्याची संपूर्ण देशभर विनाविलंब अंमलबजावणी करावी. आपण आमची ही मागणी केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावी, असे नमूद केले आहे.संविधानाची काढली पालखीतून मिरवणूकपोलीस निरीक्षक शंकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी विवेक विचार मंचाचे सहसंयोजक उमाकांत गायकवाड यांनी सांगितले की, हा कायदा लागू झाला पाहिजे. लोकसंख्या नियंत्रित झाली पाहिजे. देशभक्तीचे प्रदर्शन असता कामा नये तर देशभक्तीला मर्यादा घालून घ्यावी लागेल. यासाठी आपण या सुधारणा कायद्याला पाठिंबा द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी ढोलताशांच्या गजरात पालखीतून संविधनाची मिरवणूक काढण्यात आली. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकsindhudurgसिंधुदुर्ग